एक्स्प्लोर
1 ते 5 नोव्हेंबर, फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह धमाका
फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोन ते घरगुती वस्तूंपर्यंत 80 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. तसेच अनेक वस्तूंवर एक्स्चेंज ऑफरसोबत अॅक्सिडेंटल वॉरंटीची सोय देण्यात येणार आहे.

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा बंपर सेल घेऊन येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं बिग फेस्टिव्ह सेल आणला आहे. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा फेस्टिव्ह सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोन ते घरगुती वस्तूंपर्यंत 80 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. तसेच अनेक वस्तूंवर एक्स्चेंज ऑफरसोबत अॅक्सिडेंटल वॉरंटीची सोय देण्यात येणार आहे. या शॉपिंग वेबसाईट्सवर मोबाईलसोबतच मोबाईल अॅक्सेसरीज, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज यासारख्या अनेक उत्पादनांवरही आजपासून भरघोस सूट मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर या दोन्ही शॉपिंग साईटवर सेल सुरु होता. अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टीव्हल म्हणून तर फ्लिपकार्टवर फेस्टीव्ह धमाका हा सेल सुरु होता. फ्लिपकार्टच्या फेस्टीव्ह धमाका सेलमध्ये कपड्यांवर 90 टक्के तर इलेक्ट्रीक वस्तूंवर 80 टक्के सूट देण्यात आला होता.
आणखी वाचा






















