एक्स्प्लोर
11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं
बँकॉक : थायलंडमधील हादरवून टाकणाऱ्या घटनेने फेसबुक लाईव्हवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
एका बापाने आपल्या 11 महिन्याच्या मुलीच्या गळ्यात फास अडकवून तिला लटकवून ठार केलं. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
धक्कादायक म्हणजे या बापाने हा सर्वप्रकार फेसबुकवरुन लाईव्ह केला. त्यापेक्षा थरारक म्हणजे हा चार मिनिटांचा व्हिडीओ आणि बाळाची तडफड त्या चिमुकलीच्या आईसह जगाने पाहिली.
तब्बल 24 तास हा व्हिडीओ फेसबुकवर होता, त्यानंतर तो हटवण्यात आला. या व्हिडीओत चिमुकलीची तडफड पाहून कोणाचंही काळीज तुटल्याशिवाय राहणार नाही.
चिमुकलीच्या आईसोबत झालेल्या वादातून बापाने हे टोकाचं पाऊल उचललं. ज्या चिमुकलीला दोरी म्हणजे काय हे माहीतही नाही, त्या चिमुकलीला त्याच दोरीने लटकवण्यात आलं.
थायलंडमधील फुकेत परिसरातील एका रिसॉर्टमध्ये 21 वर्षीय पित्याने हे कृत्य केलं. त्याच्या स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओत, बापाने 11 महिन्याच्या चिमुकलीच्या गळ्यात दोरी अडकवल्याचं दिसलं. चिमुकलीच्या मानेपेक्षा मोठी असलेल्या दोरीने तिला लटकवून दिलं. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचं दिसतं.
चिमुकलीच्या बापाच्या फेसबुक अकाऊंटवर विचलित करणाऱ्या दोन व्हिडीओ क्लिप 24 तास होत्या. या दोन्हीही फेसबुक लाईव्हच्या होत्या. यापैकी पहिली व्हिडीओ क्लिप 1 लाख 12 हजार लोकांनी पाहिली, तर दुसरी क्लिप 2 लाख 58 हजार वेळा पाहण्यात आली.
सुमारे 24 तासानंतर विचलित करणारे हे व्हिडीओ फेसबुकवरुन हटवण्यात आले.
थायलंडच्या डिजिटल इकॉनॉमी मंत्रालयाने फेसबुकशी संपर्क साधल्यानंतर हे व्हिडीओ हटवण्यात आले.
दुसरीकडे हेच व्हिडीओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आले होते, त्याला 2351 व्ह्यूव्ज मिळाले. मात्र ते व्हिडीओ यूट्यूबवरुन 15 मिनिटात हटवण्यात आले.
फेसबुकही हळहळलं
हे व्हिडीओ पाहून फेसबुक प्रशासनही हळहळलं.
"ही अत्यंत भयानक घटना आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. अशाप्रकारच्या घटनांसाठी फेसबुकवर स्थान नाही. हे भयंकर व्हिडीओ आम्ही हटवले आहेत", असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement