एक्स्प्लोर
जगभरात फेसबुक डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण

मुंबई: जगभरातील सर्वात मोठी सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक आज (मंगळवार) सकाळी पूर्णत: ठप्प झाली होती. जगभरातील कोट्यवधी यूजर्सनं सकाळी फेसबुक लॉग इन केल्यानंतर त्यांना या अडचणीचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया आणि आशियातील 1.6 कोटी यूजर्सला याचा फटका बसला. ऑस्ट्रेलियात सकाळी 11 वाजेपासून यूजर्सला फेसबुक सुरु करण्यात अडचणी येत होत्या.
फेसबुक डाऊन असल्यानं यूजर्सनं फेसबुक लॉग इन केल्यावर त्यांना एरर असल्याचं दाखवलं जात होतं. ‘समथिंग वेंट रांग’ असं या एररमध्ये दाखवलं जात होतं. फेसबुक डाऊन होताच हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करणं सुरु झालं. काही यूजर्सनं फेसबुक डाऊन झाल्यानं ट्विटरवर त्याची खिल्लीही उडवली. फेसबुककडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे यूजर्सला या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळानं मात्र, फेसबुकनं ही अडचण दूर केली. त्यानंतर फेसबुक पुन्हा एकदा सुरु झालं.
फेसबुक डाऊन असल्यानं यूजर्सनं फेसबुक लॉग इन केल्यावर त्यांना एरर असल्याचं दाखवलं जात होतं. ‘समथिंग वेंट रांग’ असं या एररमध्ये दाखवलं जात होतं. फेसबुक डाऊन होताच हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करणं सुरु झालं. काही यूजर्सनं फेसबुक डाऊन झाल्यानं ट्विटरवर त्याची खिल्लीही उडवली. फेसबुककडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे यूजर्सला या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळानं मात्र, फेसबुकनं ही अडचण दूर केली. त्यानंतर फेसबुक पुन्हा एकदा सुरु झालं. Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















