Twitter Blue Tick : ब्लू टिकचा रंग बदलणार? ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा निर्णय लांबणीवर
Twitter Blue Tick : ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा ( Twitter Blue Subscription ) निर्णय तूर्तास स्थगित केला आहे.
Twitter Blue Tick : ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा ( Twitter Blue Subscription ) निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र आता हा निर्णय लांबवण्यात आला आहे. मस्क यांनी ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरु करण्याचा निर्णय लांबवला आहे. मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं
एलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यक्ती आणि संस्थांसाठी वेगळ्या रंगाची टिक वापरण्याचा विचारही सुरु आहे.
Holding off relaunch of Blue Verified until there is high confidence of stopping impersonation.
— Elon Musk (@elonmusk) November 22, 2022
Will probably use different color check for organizations than individuals.
फेक अकाऊंटवरील कारवाईसाठी लांबवला निर्णय
बनावट खात्यांवर कारवाई केल्यानंतर ट्विटरकडून ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरू केली जाऊ शकते. यापूर्वी मस्क यांनी सांगितलं होतं की ब्लू टिक सब्सक्रिप्शन प्लान 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण आता मस्क यांनी नवीन ट्विट करत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच सध्या पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. या नवीन अपडेटसाठी युजर्सला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
वेगळ्या रंगाच्या टिक वापरण्याचा विचार सुरु
ट्विटर कंपनीचे नवीन सीईओ एलॉन मस्क यांनी आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं आहे. रिपोर्टनुसार, युजर्सना ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, जोपर्यंत या प्लॅटफॉर्मवर फेक अकाऊंट बंद करता येतील याची खात्री होत नाही तोपर्यंत ते ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवण्यात येत आहेत. तसेच कंपनी व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी वेगळ्या रंगाचं टिक आणण्याचा विचार करत आहे. येत्या काळात याबाबत अधिक अपडेट समोर येईल.