एक्स्प्लोर

Twitter Blue Tick : तुमची ब्लू टिक धोक्यात! ब्लूक टिक ट्विटर अकाऊंटची पडताळणी होणार; मस्क यांचं ट्विट चर्चेत

Twitter Accounts : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क मोठे बदल करत आहेत. आता मस्क यांनी सांगितलं आहे की, ट्विटरवरील ब्लूक टिक अकाऊंटची पडताळणी होणार असून अपात्र ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे.

Twitter Update : जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे ( Twitter ) नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ब्लू टिक ट्विटर अकाऊंट ( Twitter Blue Tick Account ) युजर्सला आणखी एक झटका दिला आहे. ट्विटरवरील ब्लूक टिक अकाऊंटची पडताळणी होणार असून अपात्र ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विट करत म्हटलंय की, ट्विटरने याआधी दिलेल्या ब्लू टिकची पडताळणी होणार असून पात्र न ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येईल.

ब्लू टिक अकाऊंट्सची पडताळणी होणार

एलॉन मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'ट्विटरच्या आधीच्या ब्लू टिक प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ब्लू टिकची पडताळणी होणार असून पात्र नसणाऱ्यांची ब्लू टिक हटवण्यात येईल.'

पॅरोडी अकाऊंट्सवर मस्क यांचा निशाणा

दरम्यान, ट्विटर सध्या पॅरोडी अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की, पॅरोडी अकाऊंट्स हे लोकांना फसवण्याचं काम करत आहेत. सध्या ट्विटकडून बनावट अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. अनेक बनावट अकाऊंट्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळ यापुढे पॅरोडी अकाऊंट्सने त्याच्या बायोमध्ये पॅरोडी अकाऊंट असल्याचं लिहिणं बंधनकारक असेल, अन्यथा ते अकाऊंट बंद करण्यात येईल.

पॅरोडी अकाऊंट्स हटवण्यात येणार

ट्विटरवर अनेक पॅरोडी अकाऊंट ( Parody Twitter Account ) म्हणजे फेक अकाऊंट आहेत. पॅरोडी अकाऊंट म्हणजे एखादं ट्विटर अकाऊंट जे दुसरी व्यक्ती, गट किंवा संस्थेच्या प्रोफाइलचा वापर करुन त्या विषयावर चर्चा करण्यासाठी, उपहासात्मक पोस्ट करण्यासाठी वापरलं जातं. जर कुणी इतरांचा फोटो किंवा माहिती वापरून बनावट खातं बनवून त्याचा वापर करत असेल, तर असे अकाऊंट कायमस्वरूपी हटवण्यात येणार आहे.

'कंपनी येत्या काळात अनेक बदल करेल'

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून मस्क दररोज मोठमोठे बदल करताना दिसत आहेत. एलॉन मस्क यांनी बुधवारी ट्विट करत सांगितलं होतं की, 'ट्विटर कंपनी येत्या काही महिन्यांत ट्रायल-एंड-एररच्या आधारावर अनेक गोष्टी करेल.' एलॉन मस्क याधी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत असायचे. आता ट्विटर डीलमुळे एलॉन मस्क अधिक चर्चे आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घटनेच्या 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घटनेच्या 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
घटनेच्या 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

Embed widget