नशीब बलवत्तर म्हणून... 300 फूट खोल दरीत कोसळली कार, iPhone 14 मुळे बचावले
California News : आयफोनमुळे एका दाम्पत्याचा जीव वाचला आहे. त्यांची कार 300 फूट खोल दरीत कोसळली होती. आयफोन इर्मजंन्सी SOS सॅटेलाइटमुळे हे दोघे बचावले.
Couple Survived due to iPhone 14 : नशीब बलवत्तर म्हणून 300 फूट खोल दरीत कोसळलेल्या दोघ जण आयफोनमुळे (iPhone) बचावले आहेत. आयफोनमुळे जीव वाचला हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी, हे खरं आहे. आयफोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे. आयफोनमधील विविध फिचर्स वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी बनवण्यात आले आहेत. त्यांचा योग्य वापर तुमचा जीव वाचू शकतो, याचा अनुभव एका जोडप्याला आला आहे. 300 फूट खोल दरीत अडकलेल्या या जोडप्याची आयफोनमळे मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली.
अमेरिकेमध्ये ही घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका जोडप्याचा आयफोन 14 मुळे जीव वाचला आहे. ॲपल कंपनीने नवीन आयफोनमध्ये अनेक आधुनिक फिचर दिले आहेत. आयफोनमध्ये इर्मजंन्सी एसओएस (SOS) सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचर (SOS Satellite Connectivity Feature) देण्यात आलं आहे. या फिचरमुळे या जोडप्याचा जीव वाचला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एंजेलिस फॉरेस्ट हायवेवर एक अपघात झाला आणि एक कार डोंगरावरून 300 फूट खोल दरीत कोसळली. 300 फूट खोल दरीत या जोडप्याची कार अडकली होती. अशा वेळी दोघांना कारमधून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि त्यांच्या फोनलाही नेटवर्क मिळत नव्हता. पण आयफोनच्या फिचरमुळे त्यांची सुटका झाली
कार अपघात झाल्यावर आयफोन 14 ( iPhone 14) मधील एसओएस (SOS) फिचर ॲक्टिव्ह झालं. आयफोनमध्ये इर्मजंन्सी एसओएस (SOS) सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचरद्वारे ॲपल कंपनीला अपघाताचा सॅटेलाईट मजकूर पाठवण्यात आला. यामध्ये अपघाताची लोकेशनही नमूद होती. ॲपल कंपनीकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 300 फूट खोल दरीत अडकलेल्या जोडप्याला एअरलिफ्ट केलं.
जोडप्याला एअरलिफ्ट केल्याचा व्हिडीओ
Deputies, Fire Notified of Vehicle Over the Side Via iPhone Emergency Satellite Service
— Montrose Search & Rescue Team (Ca.) (@MontroseSAR) December 14, 2022
This afternoon at approximately 1:55 PM, @CVLASD received a call from the Apple emergency satellite service. The informant and another victim had been involved in a single vehicle accident pic.twitter.com/tFWGMU5h3V
ॲपल कंपनीकडून या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थाळी दाखल झालं. बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जोडप्याला दरीतून बाहेर काढत दोघांचे प्राण वाचवले. मोंटेरोस सर्च टीमने या घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Apple AirTag : ॲपलमुळे सापडला हरवलेला कुत्रा, काय आहे Apple AirTag उपकरण?