एक्स्प्लोर
डाटा पॅक दर कपातीसाठी कंपन्यांची स्पर्धा
नवी दिल्लीः इंटरनेट डाटा दर कमी करण्यावरुन सध्या सेल्यूलर कंपन्यांमध्ये एक अनोखी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आयडियाने मागील आठवड्यात 3 जी आणि 4 जीच्या दरात जवळपास 67 टक्के कपात केली. त्यानंतर एअरटेलनेही डाटा पॅकचे दर कमी केले आहेत.
रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांची ही स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. आयडियाच्या जास्त डाटा वापरणाऱ्या ग्राहकांना दर कपातीचा खास फायदा होणार आहे.
आयडिया, एअरटेलची दर कपात
आयडियाचा 10 जीबीचा 3 जी आणि 4 जी डाटा पॅक आता 990 रुपयांत मिळत आहे. तर 5 जीबीचा डाटा पॅक 649 रुपयांत मिळत आहे. एअरटेलने देखील नुकतीच मोठी दर कपात केली आहे. आयडियाने रिलायन्स जीओने खास ऑफर आणल्यानंतर तत्काळ ही दर कपात केली, असं सांगितलं जात आहे.
रिलायन्स जीओचा धुमाकूळ
कमर्शिअल लाँचिंग अगोदरच रिलायन्स जियोसोबत 15 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. जीओ 2 हजार 999 रुपयाच्या मोबाईलसह 90 दिवसांसाठी 4 जी अनलिमीटेड डाटा आणि इंटरनेट कॉलिंग मोफत देत आहे, असा दावा रिलायन्सने केला आहे.
संबंधित बातम्याः
एअरटेलच्या डेटा किंमतीत कपात, नेट पॅक स्वस्त
Idea चे नेटपॅक स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement