(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किंमत कमी, फीचर्स दमदार; फक्त 599 मध्ये खरेदी करा 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर
Infinix Smart 6 HD : नवीन वर्षात तुम्हाला स्वत:साठी स्वस्त आणि चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे का? तर हीच योग्य वेळ आहे. Infinix Smart 6 HD वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे.
Infinix Smart 6 HD : नवीन वर्षात तुम्हाला स्वत:साठी स्वस्त आणि चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे का? तर हीच योग्य वेळ आहे. Infinix Smart 6 HD वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ज्या अंतर्गत तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अशा ऑफर्स बाजारात क्वचितच पाहायला मिळतात. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 5000 mah ची मोठी बॅटरी आणि 32 GB स्टोरेज स्पेस मिळेल. काय आहे या स्मार्टफोनवर ऑफर हे जाणून घेऊ...
बाजारात Infinix Smart 6 HD ची किंमत 8,000 रुपये असली तरी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 35% डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन 5,799 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय या मोबाईलवर एक खास ऑफर दिली जात आहे. ग्राहकांना Infinix Smart 6 HD वर एक्सचेंज ऑफरचा लाभ दिला जात आहे, ज्या अंतर्गत त्यांना या स्मार्टफोनवर 5,200 ची सूट मिळू शकते. तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळाल्यास, तुम्ही फक्त 599 रुपयांमध्ये Infinix Smart 6 HD खरेदी करू शकता. यातच जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या चालत नसते, तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेऊ शकता. तसेच ज्यांच्याकडे जुना फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध आहे, तेच या किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकतील.
Infinix Smart 6 HD फीचर्स
Infinix Smart 6 HD मध्ये ग्राहकांना 6.6 TFT LCD डिस्प्ले मिळतो. जो 60 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल फोन मोठ्या 5000 mah बॅटरीसह येतो, जो 5 वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो. मोबाईल फोन MediaTek च्या Helio A22 SoC वर काम करतो. यामध्ये तुम्हाला 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Infinix Smart 6 HD च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे, ज्यामध्ये 8 mp मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर समोर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 mp कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोन्सवरही मिळत आहे मोठी सूट
याशिवाय तुम्ही स्वस्त किंमतीत ई-कॉमर्स वेबसाइटवरून Oppo Reno 7 5G, Moto E40, Moto g51, iPhone 12 mini इत्यादी स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता. आज तुम्ही यापैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्ही एमआरपीवर 2 ते 3,000 रुपये वाचवू शकता.