एक्स्प्लोर
Advertisement
अॅमेझॉनला 70 लाखांचा गंडा, आरोपी महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात
बंगळुरु: ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉन इंडियाला कथित स्वरुपात जवळजवळ 70 लाख रुपयांना गंडवणाऱ्या एका महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेली आरोपी महिला ही मुळची प. बंगालची आहे.
नेमका आरोप काय?
ही महिला अमेझॉन इंडिया या ऑनलाईन वेबसाईटवरुन अनेक वस्तू खरेदी करायची. खरेदी केलेली वस्तू खराब असल्याचं सांगत ती पैसे परत घ्यायची. पण ती ज्या वस्तू परत करायची त्या वस्तू अमेझॉन इंडियावरुन खरेदी केलेल्या नसायच्या. तर त्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या वस्तू ती अमेझॉनला परत करायची. तर अमेझॉनचे चांगले प्रोडक्ट ती इतर ऑनलाईन पोर्टलला विकायची.
या महिलेनं अमेझॉनला तब्बल 70 लाखांना गंडवल्याचा आरोप आहे. बनावट नावानं तिनं आतापर्यंत 104 वस्तू खरेदी केल्या होत्या. यामध्ये मोबाइल फोन, कॅमेरा, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. या वस्तू मागवल्यानंतर ती 24 तासात त्या परत करुन रिफंड घेत होती. पण तेव्हा ती तशाच दिसणाऱ्या खराब वस्तू परत करायची. ती डिलिव्हरी आणि कलेक्शनसाठी दरवेळेस नवनवीन पत्ता देत होती.
बंगळुरुत अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आरोपी महिलेची अधिक चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement