एक्स्प्लोर

Amazon आणि Flipkartवर आजपासून स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीला सुरुवात

भारत सरकारच्या नियमांनुसार ज्या भागात रेड झोन घोषित आहे अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंची डिलिव्हरी होणार नाही.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यांना ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. सरकारने यावेळी देशांतील काही भागांत लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आजपासून ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये स्मार्टफोन, फ्रिज आणि स्मार्ट टीव्ही यांची विक्री सुरु झाली आहे. याशिवाय या दोन्ही झोनमध्ये किरकोळ दुकानं देखील चालू होणार आहेत. सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीला देखील सरुवात होणार आहे. या दोन्ही झोमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत विक्री सुरु राहणार आहे. वाचा : Lockdown-3 | तुमचं शहर कोणत्या झोनमध्ये? लॉकडाऊन शिथील होणार की नाही? जाणून घ्या भारत सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये किरकोळ दुकानं चालू होणार आहे. ज्यात स्मार्टफोन विक्री करणाऱ्या दुकानांचा देखील समावेश आहे. म्हणजेच नागरिक आता स्मार्टफोनची खरेदी करु शकणार आहे. पण ज्या भागात रेड झोन घोषित आहे अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंची  डिलिव्हरी होणार नाही. भारत सरकारनुसार रेड झोनमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळुरु आणि अहमदाबाद सारख्या शहरांचा समावेश आहे. या शहरांत कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून आला आहे. देशात या शहरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंची डिलीवरी करण्यात येणार नाही. भारत सरकारच्या या निर्णयाने ई-कॉमर्स कंपनींच्या विक्रीत 60 टक्कयांनी वाढ होणार आहे. देशात सलग तिसरा लॉकडाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे. Corona Zones | राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काय सुरू होणार आणि काय बंद राहील? पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Embed widget