एक्स्प्लोर
499 रुपयात 35 जीबी 4जी डेटा, एअरटेलची नवी ऑफर
मुंबई: रिलायन्स जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात बरीच उलथापालथ झाली. यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यामुळे इतर कंपन्यांनी देखील नवनवीन ऑफर आणल्या आहेत. आता एअरटेल पुन्हा एक नवी ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.
एअरटेलनं आपल्या ग्राहकांना अवघ्या 499 रुपयात 35 जीबी 4जी डेटा देणार आहे. एअरटेलनं 'व्हॅल्यू फॉर मनी' यामध्ये हा नवा प्लान आणला आहे. ही ऑफर नव्या 4जी डोंगल ग्राहकांना मिळणार आहे.
- सुरुवातीला एअरटेलचं 1500 रुपये किंमतीचं डोंगल तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे. याआधील या डोंगलची किंमत 3000 रुपये होती. पण काही दिवसांपूर्वीच या डोंगलच्या किंमतीत 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली.
- डोंगल खरेदी केल्यानंतर तुम्हाला 499 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल.
- रिचार्ज झाल्यानंतर तुम्हाला 35 जीबी डेटा मिळणार आहे. जे 1 महिन्यासाठी वैध असणार आहे.
डोंगल डेटा ऑफरसोबतच एअरटेलनं आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठीही 30 जीबी फ्री डेटाची घोषणा केली आहे. एअरटेलनं मान्सून सरप्राईज ऑफर एक जुलैपासून सुरु केली आहे. नवी मान्सून ऑफर ही फक्त पोस्टपेड यूजर्ससाठीच असणार आहे. जी एअरटेलच्या अॅपमधून मिळवता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement