एक्स्प्लोर
Advertisement
Aadhaar Virtual Id : अवघ्या काही मिनिटांत तयार करा आधार कार्डाचा वर्च्युअल आयडी; फॉलो करा 'या' टिप्स
Aadhaar Virtual Id : वर्च्युअल आयडी 16 डिजिटचा असतो. UIDAI कडून आधार कार्डाचा वर्च्युअल आयडी (Virtual ID) जारी करण्यात येतो
Aadhaar Virtual Id : आधार कार्ड म्हणजे, सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्डाची गरज भासते. अनेकजण आधार कार्ड आपल्या सोबत ठेवतात. पण हेच आधार कार्ड दररोज सोबत घेऊन फिरणं कठिण होतं. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये न ठेवता ते तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता.
UIDAI कडून आधार कार्डाचा वर्च्युअल आयडी (Virtual ID) जारी करण्यात येतो. हा वर्च्युअल आयडी UIDAI वेबसाइटवरुन तयार करण्यात येतो. जाणून घेऊया वर्च्युअल आयडी काय आहे? आणि कसा तयार करण्यात येतो?
काय आहे आधार वर्च्युअल आयडी?
- वर्च्युअल आयडी 16 डिजिटचा नंबर असतो.
- या नंबरला आधारसाठी पर्याय म्हणून वापरता येऊ शकतं.
- हे बॅकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी मान्य आहे.
- याची वैध्यता एका दिवसाची असल्याचं सांगितलं जातं. पण जोपर्यंत युजर्स दुसरा Virtual ID क्रिएट करत नाहीत, तोपर्यंत हा आयडी वैध्य असतो.
- आधार वर्च्युअल आयडीच्या वैध्यतेबाबत सध्या कोणताही वेळ, काळ निश्चित करण्यात आलेला नाही.
असा जनरेट करा आधार वर्च्युअल आयडी :
- UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://www.uidai.gov.in वर जा
- वेबसाईटवर लॉगइन करा आणि आधार सर्विसमध्ये जा, तिथे वर्च्युअल आयडीवर क्लिक करा.
- आता एक पेज ओपन झालं. यामध्ये तुम्हाला 16 डिजिटचा आधार क्रमांक दाखल करावा लागेल.
- त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून OTP जनरेट करा.
- OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर येईल.
- ओटीपी सबमिट करा आणि Generate VID ऑप्शनवर क्लिक करा
- त्यानंतर वर्च्युअल आयडी जनरेट झाल्याचा मेसेज येईल
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
निवडणूक
बातम्या
Advertisement