एक्स्प्लोर

Tanhaji Movie Review | पुरेपूर लिबर्टी घेऊन केलेली शौर्यगाथा 

हिंदी दिग्दर्शकांनी अशी लिबर्टी घेतलेले सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतलेच. पण इथे का घेऊ नये, असा प्रश्न पडणंही स्वाभाविक आहे. पण ही घेलेली लिबर्टी पचवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिनेमाच्या ट्रेलरमुळे यापूर्वीच चित्रपटातले संवाद गाजताहेत. शिवाय, एक्शनही आहेच.

शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आदी मावळ्यांची शौर्यगाथा मराठी मनासाठी नवी नाही. किंबहुना याच शौर्याच्या गोष्टी ऐकत महाराष्ट्रातला प्रत्येकजण मोठा झाला आहे. यात तानाजी मालुसरे आणि 'गड आला पण सिंह गेला' हे शिवरायांचे उद्गार प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहेत. कोंढाण्याची हीच लढाई दिग्दर्शक ओम राऊत यांनी पडद्यावर आणली आहे. अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, काजोल यांसह देवदत्त नागे, शशांक शेंडे आदी अनेक मराठी कलाकारांची फळी या सिनेमात आहेत.

ही गोष्ट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची आहे. कोंढाणा काबीज करण्यासाठी आपल्या घरातलं लग्न लांबणीवर टाकणारे, शिवरायांच्या शब्दासाठी, स्वराज्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे लढवय्ये तानाजी मालुसरे युद्धकलेत निपुण होतेच पण डाव प्रतिडाव आखण्यातही तरबेज होते. या सिनेमातून ते दिसतं. उच्च तांत्रिक मूल्य, पकड घेणारे युद्धाची दृश्य आणि ऐन युद्धात दिग्दर्शकाने दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. विशेषत: उदयभानने केलेली मराठा सैन्याची फसगत. कोंढाण्यावर चढाई करण्यासाठी वापरलेले बांबू. आदी अनेक गोष्टी पारणं फेडतात. सिनेमाचा शेवटही थरारक आणि अभिमानाने मराठी मन अधिक उंच करणारा. चित्रपट पकड घेतो.. व्यक्तिरेखा अधोरेखित करतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने शिवराय, नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम देशभरात पोहोचेल यात शंका नाही. पण हा सिनेमा पाहताना किंतु परंतु उद्भवतात ते सिनेमॅटिक लिबर्टी समोर आल्यानंतर. चित्रपटात तानाजी मालुसरे उदयभानला पाहण्यासाठी कोढाण्यावर जातात असं दाखवण्यात आलं आहे. तो सगळा सिक्वेन्स सिनेमॅटिक झाला आहे. तितकीच बाब खटकते ती कोढाण्यावर शंकराच्या गाण्यावर ताल धरलेले तानाजी पाहिल्यानंतर. याशिवाय, शेवटी येणारं गाणंही जरा खटकणारं. पण मग मुद्दा कमर्शिअल सिनेमाचा येतो. म्हणजे, इतर हिंदी दिग्दर्शकांनी अशी लिबर्टी घेतलेले सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतलेच. पण इथे का घेऊ नये, असा प्रश्न पडणंही स्वाभाविक आहे. पण ही घेलेली लिबर्टी पचवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिनेमाच्या ट्रेलरमुळे यापूर्वीच चित्रपटातले संवाद गाजताहेत. शिवाय, अॅक्शनही आहेच.
अजय देवगण, सैफ अली खान यांचा अभिनय उत्तम आहे. अजय देवगण अलिकडे सर्व सिनेमांमध्ये एकसारखाच अभिनय करतो हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं आहे. सिंघम असो, रेड असो किंवा तानाजी.. त्यांचा टोन.. देहबोली जवळजवळ सारखी आहे. एकदा अजय देवगण यांना आपण तानाजी मानलं की या भूमिकेत त्याची देहबोली, त्याची नजर घायाळ करते हेही खरं.
तर असा हा 'तानाजी.. द अनसंग वॉरिअर' हा सिनेमा बनलेला आहे. एकदा पाहायला हरकत नाही. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार्स. हा अनुभव थिएटरमध्ये घ्यावा.
संबंधित बातम्या 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget