एक्स्प्लोर
..."छत्रपती शिवाजी महाराज" अन् टाळ्यांचा कडकडाट
'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान एका महिलेने शरद केळकरला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला. परंतु हा प्रश्न विचारताना त्या महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला होता.
मुंबई : बहुप्रतिक्षित 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची, सैफ अली खान उदयभानसिंह राठोडची आणि अभिनेता शरद शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
आज चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान एका महिलेने शरद केळकरला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला. परंतु हा प्रश्न विचारताना त्या महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावर शरद केळकरने तिला रोखत छ्त्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला. शरदच्या या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह एकच जल्लोष केला. शरद केळकरच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. शिवप्रेमी शरद केळकरवर कौतुकाचा वर्षाव करु लागले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. #Boycott_KBC_SonyTv असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड झाला होता. त्यानंतर सोनी टिव्ही आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफिदेखील मागितली होती.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement