एक्स्प्लोर

गेल्या 24 दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार संपावर

शासन हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना टनभर ऊस तोडायला पाचशे रुपयाच्या जवळपास खर्च करते. मजुरांना मात्र तोडणी करायला 228 रुपये टनाला देतात.

बीड : दसरा जसजसा जवळ येतोय, तसतशी ऊसतोड कामगारांची साखर कारखान्याला जायची लगबग सुरु होते. यावर्षी मात्र हे ऊसतोड कामगार मागच्या 24 दिवसांपासून संपावर आहेत. तरीही या कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चेच्या कोणत्याही हालचाली पाहायाला मिळत नाहीत. एकीकडे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक ऊस शेतात उभा असताना, ऊसतोड कामगार मात्र हाती कोयता घ्यायला तयार नाहीत, म्हणून मोठा पेच निर्माण झाला आहे. आपलं बिर्‍हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त काल भटकंती करणारा समाज म्हणजे ऊसतोड कामगार. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ऊसाच्या फडात राब राब राबणार्‍या या हाताच्या कामातून साखर गोड होते खरी, मात्र या ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू असतो. एकीकडे शासन हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना टनभर ऊस तोडायला पाचशे रुपयाच्या जवळपास खर्च करते. मजुरांना मात्र तोडणी करायला 228 रुपये टनाला देतात. म्हणून शंभर टक्के दरवाढीची मागणी कामगारांनी केलीय. संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांसोबतच ऊस तोडणी मुकादमास साडे 18.5 टक्के कमिशन आहे, ते 35 टक्के करावे, अशी मागणी या आंदोलांकर्त्यांची आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय आहेत? - साल 2014-15 साठी अंतरिम दरवाढीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याची अंमलबजाणी करावी. - ऊस तोडणी दरात 100 टक्के वाढ करावी. - 35 टक्के कमिशन मुकादमास द्यावे सध्या ते18.5 टक्के आहे. - कारखाना साईटवर ऊसतोड मजूर व बैलांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात. - 15 रुपये प्रत्येक दिवशी बैलगाडीच्या टायर गाडीचे भाडे घेण्यात यावे. - 30 रुपये प्रत्येक दिवशी ट्रॅक्टर गाडीचे भाडे घ्यावे. - ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा साखर कारखान्यांनी भरावा. - 60 वर्षांच्या पुढील ऊसतोड मजूर मुकादमास पेन्शन मिळावी. - ऊसतोड मजुरांच्या मुलाकरता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा आणि वस्तीगृहाची सोय करण्यात यावी. ऊसतोड कामगार मुकादम संघटनांनी ऊस तोडणी कामगारांचा संप हा 19 ऑगस्टपासून पुकारला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या दोघांचा लवाद ऊसतोड कामगरासाठी होती. गोपीनाथ मुंडेंच्या आकाली निधनानंतर पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांची या लवादावर निवड करण्यात आलीय. नुकतीच या लवादाची एक बैठक पुण्यात पार पडली. या पूर्वी 2015 साली ऊसतोड कामगारांनी संप केला होता. मात्र त्यावेळी दुष्काळाचे दिवस असल्याने आणि ऊसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसतोड कामगारांनी तडजोड करुन संप मागे घेतला होता. यावर्षी एकतर ऊसाची उपलब्धताही विक्रमी आहे आणि त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांचा हंगाम वाढणार आहे. म्हणूनच वेळेत साखर कारखाने सुरु कारायचे असल्यास ऊसतोड कामगाराच्या संपावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget