एक्स्प्लोर

ढोबळी मिरचीची यशस्वी शेती, 2 एकरातून 18-20 लाखांचं उत्पन्न

कोल्हापूर : कोल्हापुरातल्या चिंचवडच्या अभिनंदन पाटील या तरुण शेतकऱ्याने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करुन दाखवली आहे. कमी जागेत लाखोंमध्ये उत्पन्न मिळवून इतर तरुणांसमोर अभिनंदन पाटील आदर्श बनला आहे.     स्थानिक ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय     अभिनंदनला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. मात्र, शिक्षण सुरु असल्यानं शेतीत लक्ष देता येत नव्हतं. 2005 साली अभिनंदनचं बी.कॉम पूर्ण झालं. मात्र त्याच वर्षी अभिनंदनच्या वडिलांचं निधन झालं आणि शेतीची सगळी जबाबदारी अभिनंदनवर येऊन पडली. यानंतर अभिनंदननं शेतीत पूर्णवेळ लक्ष घालायला सुरुवात केली. स्थानिक ऊस पिकाला भाजीपाला पिकांचा पर्याय दिला.     50 गुंठ्यात ढोबळी मिरची, तर 35 गुंठ्यात मिरची     यंदा जानेवारी महिन्यात अभिनंदनं आपल्या 50 गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. तर राहिलेल्या 35 गुंठ्यात हिरव्या मिरचीची लागवड केली.     जमिनीची योग्य मशागत     मिरचीच्या लागवडीपूर्वी अभिनंदननं जमीन चांगली नांगरुन घेतली. त्यात डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेढ, करंजी पेंढ या खतांचे बेसल डोस दिले आणि बेड तयार केले.     50 गुंठ्यात ढोबळी मिरचीची 17 हजार रोपांची लागवड     पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या. मल्चिंग पेपर अंथरुन त्यावर ढोबळी मिरचीच्या रोपांची रोवण केली. 50 गुंठ्यासाठी अभिनंदनला ढोबळी मिरचीची 17 हजार रोपं लागली.     35 गुंठ्यात VNR-109 जातीच्या मिरचीची लागवड     तर उरलेल्या 35 गुंठ्यात याच पद्धतीनं व्हीएनआर-109 या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर दर चार दिवसांनी किडनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या. लागवडीनंतर 45 दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोड्याला 300 किलो ढोबळी मिरचीचं, तर 150 किलो मिरचीचं उत्पादन मिळालं. आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची पोत्यात भरून सांगली बाजारपेठेत पाठवली जाते.     ढोबळी मिरचीला किलोमागे 40-45 रुपयांचा दर     आतापर्यंत ढोबळी मिरचीचे 5 तोडे झाले असून, त्यातून 10 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन मिळालं आहे. याला सांगली बाजारपेठेत किलोमागं 40 ते 45 रुपयांचा दर मिळाला आहे.     50 गुंठ्यातून 16 लाखांचं उत्पन्न     अजून दोन ते अडीच महिने यातून उत्पादन सुरु राहणार असून अभिनंदनला यातून 30 टन ढोबळी मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. ज्याला 40 रुपयांचा जरी दर मिळाला, तरी या प्लॉटमधून त्यांना 16 लाखांचं उत्पन्न मिळेल.     खर्च वजा केल्यास 11-12 लाखांचा निव्वळ नफा     यातून रोपं, खतं, किडनाशक, ठिबक, वाहतूक, मजूरी असा साडेचार लाखांचा खर्च वजा जाता अभिनंदनला 11 ते 12 लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.     मिरचीला किलोमागे 50-55 रुपयांचा दर     मिरचीचे आतापर्यंत 4 तोडे झाले असून, यातून 8 टन मिरचीचं उत्पादन मिळालं आहे. या मिरचीला सांगली बाजारात किलोमागं 50 ते 55 रुपयांचा दर मिळाला आहे.     मिरची पिकातून 8 लाखांचा निव्वळ नफा     अजून 6 महिने या मिरचीच उत्पादन सुरु राहणार असून यातून 12 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा अभिनंदनला आहे. यातून रोपं, खतं, किडनाशकं, मजूरी, वाहतूक असा सगळा मिळून 4 लाखांचा खर्च वजा जाता अभिनंदनला 8 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.     म्हणजेच या दोन एकरातून अभिनंदनला यंदा 18 ते 20 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.     इतर पिकांपेक्षा भाजीपाला पिकाला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतात, तर बाजारातील पडणाऱ्या दराचाही धोका असतो. मात्र, हा धोका पत्कारुन अभिनंदननं भाजीपाला पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ज्याचा फायदा त्याला यंदा नक्कीच झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget