एक्स्प्लोर

Song Jae Rim Passes Away: "एका लांबच्या प्रवासाची सुरुवात..."; के-ड्रामा स्टार सॉन्ग जे रिमच्या मृत्यूनंतर शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल, बायोमध्येही केलेले बदल

Song Jae Rim Passes Away: 'द मून एम्ब्रेसिंग द सन'साठी प्रसिद्ध असलेला अभिनेता 39 वर्षांचा होता. तो राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह आणि दोन पानांची चिठ्ठी सापडली.

Song Jae Rim Passes Away:  दक्षिण कोरियाचा के-ड्रामा स्टार सॉन्ग जे रिमच्या (Song Jae Rim Dided) मृत्यूनं अवघं जग हादरलं आहे. 12 नोव्हेंबर 2024 (मंगळवार) रोजी सॉन्ग जे रिमचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. तसेच, एक चिठ्ठीदेखील सापडली होती. त्यामुळे अभिनेत्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आज अभिनेत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

'द मून एम्ब्रेसिंग द सन'साठी प्रसिद्ध असलेला अभिनेता 39 वर्षांचा होता. तो राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह आणि दोन पानांची चिठ्ठी सापडली. अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सॉन्ग जे रिमच्या निधनाच्या बातमीनं केवळ दक्षिण कोरियाच नाहीतर, अवघं जग हळहळलं. पण, सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनं जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही पोस्ट अभिनेत्यानं जानेवारीमध्ये केली होती. 

सॉन्ग जे रिमचे इन्स्टाग्रामवर 437K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर, तिची शेवटची पोस्ट या वर्षी जानेवारीत केली होती. त्यावेळी अभिनेत्यानं त्याच्या मेकअप रूममधून दोन सेल्फी शेअर केले होते. फोटो क्लिक केला त्यावेळी त्यानं काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि तो ड्रेसिंग टेबलवर बसला होता. त्यानं इमोजीसह पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, अभिनेत्यानं पोस्टचं कमेंट सेक्शन बंद केलं होतं. 

सॉन्ग जे रिमची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट काय? 

एकीकडे सॉन्ग जे रिमची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे तर दुसरीकडे इन्स्टाग्रामवर त्याच्या बायोचीही चर्चा होत आहे. त्याच्या इंस्टाग्राम बायोवर लिहिलं आहे की, "दीर्घ प्रवासाची सुरुवात..." अभिनेत्यानं अलिकडेच बायोमध्ये बदल केल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. दरम्यान, या दाव्यांची पुष्टी एबीपी माझा करत नाही. 

अभिनेत्याच्या मृतदेहाजवळ सापडलेली दोन पानांची चिठ्ठी त्याचं मृत्यूपत्र?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॉन्ग जे रिम सियोलच्या सिओंगडोंग जिल्ह्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अभिनेत्याच्या मृतदेहाजवळ 'दोन पानांची चिठ्ठी' सापडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन पानांचं पत्र कथितपणे अभिनेत्याचं मृत्युपत्र असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्याच्या कुटुंबानं अद्याप दाव्यांबद्दल आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अभिनेत्यावर आज अंत्यसंस्कार 

साँग जे रिमच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक्सपोर्ट्सन्यूजनुसार, येओइडो सेंट मेरी हॉस्पिटलच्या फ्युनरल हॉलमध्ये अभिनेत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, साँग जे रिमने 2009 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तो अनेक के-ड्रामा आणि चित्रपटांमध्ये दिसला होता. 'द मून एम्ब्रेसिंग द सन' व्यतिरिक्त 'बॉडीगार्ड'मधली त्याची व्यक्तिरेखा खूप गाजली. तो यावर्षी 'क्वीन वू'मध्ये दिसला होता. त्यांचे दोन प्रकल्प पाईपलाईनमध्ये होते. यामध्ये 'आई विल बिकम रिच' आणि 'डेथ बिझनेस' यांचा समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Embed widget