Pandharpur : 'सहकार शिरोमणी' कारखान्यासाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; पंढरपूरच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election) लागली आहे. या कारखान्यासाठी आज मतदान होत आहे.
Sahakar Shiromani Sakhar Karkhana : सध्या पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election) लागली आहे. या कारखान्यासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सहकार शिरोमणीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दोन लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात कारखान्याचे कार्यक्षेत्र
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दोन लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघातील 105 गावात कार्यक्षेत्र आहे. यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासह पंढरपूर मंगळवेढा , सांगोला , मोहोळ आणि माढा या विधानसभा मतदारसंघात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. विद्यमान चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अभिजित पाटील, डॉ. बी. पी. रोंगे अॅड. दीपक पवार यांनी एकत्रित येत पॅनेल उभे केले आहे. या दोन्ही नेत्यांनी अतिशय टोकाच्या भाषेत टीका केल्यामुळं ही निवडणूक चांगलीच गाजली आहे.
अभिजित पाटलांना रोखण्यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्ते कल्याणराव काळे यांच्या पाठीशी उभे आहेत. अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी सर्वच पक्ष आणि गटांनी कल्याणराव काळे यांच्यामागे आपली ताकद उभा केली आहे. यातच भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षाशी संधान साधले आहे. तर दुसरीकडे कल्याणराव काळे यांना गळाला लावण्यासाठी भाजपने त्यांच्या या कारखान्याला 150 कोटीचा सॉफ्ट लोन मंजूर केले आहे.
20 जागांसाठी आज मतदान
मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या एकूण 21 जागांपैकी 20 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. कारखान्याच्या सहकारी संस्था मतदारसंघातून मालन वसंतराव काळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 20 जागांसाठी आज मतदान होत आहे. आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: