एक्स्प्लोर

Ujjwala Thite Angar : उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठी चाल, अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा

Solapur NCP Ujjwala Thite: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे.

Mohol Angar Nagar Panchayat Ujjwala Thite News : अनगर नगरपंचायतीच्या (Angar Nagar Panchayat) नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्वला थिटे यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती  उज्वला थिटे यांनी दिली आहे.  

Ujjwala Thite: सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे.  अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती. सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? असा सवाल उज्वला थिटे यांनी केला. मी न्यायाल्यावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला? यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन असे थिटे म्हणाल्या. तर अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती 
सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? मी न्यायालयावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन, मला गेल्या अडीच वर्षांपासून आता लढा देण्याची सवय लागली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Ujjwala Thite: माझ्या अर्जातून चार कागद बाद करायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार

पुढे त्या म्हणाल्या, राजन पाटील यांचा कट पाहा. पूर्वीपासूनच सर्वांना कल्पना होती, यांच्या विरोधात एखादा व्यक्ती गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात उभा राहू नये असे त्यांचे प्रयत्न असतात, त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घर जाळणे हे सर्व सगळ्यांना माहिती आहे, मी भविष्यात त्यांच्यासोबत लढणार म्हणून मी माझी मतदार यादीतून नाव काढण्याचा पहिलाच प्रयत्न चालू केला आणि आता स्वतः ते म्हणतात, 302 ची कलम आम्ही भोगणारे आणि माझ्या मुलाला मी 302 च्या कलमातून बाहेर काढला आहे, मी ज्यावेळी मुलाला घेऊन माफी मागायला गेले, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302 कलमातून मुलाला सोडवला आहे, माझ्यासमोर हा असला हट्टीपणा चालणार नाही, जेव्हा तुम्ही अशा मोठ्या गुन्ह्यातून मुलाला सोडवता, मग अशा माझ्या अर्जातून चार कागद बाद करायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार आहे, असंही उज्वला थिटे यांनी म्हटलं आहे.

Ujjwala Thite: आता त्यात हा नवीन कुटाणा आहे

तिथे आम्ही तिथे दोघेच होतो, दहशती पोटी तिथं कोणी छाननीसाठी येणार नव्हतं, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना सांगितलं होतं मी सर उद्या सकाळी 11 वाजता छाननी आहे, पण आम्ही दोघे येऊ शकत नाही, ते म्हणाले वकील येतील का, इतक्या दहशती खाली कोणताही वकील तिथे उपस्थित राहणार नाही, याचाच फायदा त्यांनी तिथे घेतला, तिथे आमचा वकील छाननीसाठी गेला नव्हता, आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता कलेक्टरांच्या सांगण्यावरून केली होती, पाटील परिवारा विरुद्ध माझा लढा याआधीपासून चालू आहे, मुलाच्या दाखल्यावरची केस बाल हक्क आयोगात चालू आहे, पोलिसांनी पुरावे मिटवले, त्याची केस मानवी हक्क जवळ चालू आहे, आता त्यात हा नवीन कुटाणा आहे, आता जिल्हा न्यायालयाला जायचं यांच्या विरोधात, किंवा माझा अर्ज का बाद केला म्हणून, याबाबत मी न्यायालय लढा देणार आहे, मला आता ती सवय झाली आहे, गेले अडीच वर्ष मी घरदार सोडून पाटील परिवारामुळे मला बोंबलत फिरायची वेळ आली आहे, आता कायद्याशिवाय मी कुठे जाणार, यांच्यासारखे गुंडागर्दी करायला आमच्याकडे गुंड नाहीत, मी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी महिला आहे असाही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
Embed widget