एक्स्प्लोर

मोठी बातमी : ऐन हिवाळ्यात सोलापुरात मुसळधार पावसाचा बळी, वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हाती

Solapur Rain : सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Solapur Rain : सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सोलापुरातल्या जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली. सलाम दलाल असे 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय.

मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या 3 महिन्याचा बाळ आहे तर 5 आणि 3 वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या 26/11 च्या वेळेस वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, काही महिन्यापूर्वी त्यांचा ही मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.

सलाम दलाल हा माझा नातेवाईक होता. 26 11 च्या हल्ल्यात त्याचे वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेला दोनच दिवसांपूर्वी 14 वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आता ही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. सलाम यांना तीन लहान चिमुकले मुलं आहेत. या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या कुटुंबाला योग्य तो न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया हाजी इम्तियाज दलाल यांनी दिली. ते मृत सलाम यांचे नातेवाईक आहेत.

सोलापुरात काल संध्याकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री 11 नंतर या पावसाने रौद्ररूप धारण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहेत.  शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजला आहे. आधीच कांद्याची आवक वाढल्याने घसरलेले भाव कांदा पावसात भिजल्याने पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पळून झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. 

सोलापुरात पावसाचा धुमाकूळ -
दोन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने हाहा:कार माजवलाय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे ज्वारी, हरभरा,गहू,कांदा,तूर, मका पिकांचे मोठं नुकसान झालं. वादळी वारा आणि पावसामुळे पिके आडवी झाली. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरापाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget