एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांवर भाजपचे डोरे, फडणवीस यांची सहज भेट झाल्याचा बबन शिंदे आणि राजन पाटील यांचा दावा

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ भक्कम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे आणि राजन पाटील यांच्यावर भाजपचे डोरे असल्याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्र सदनात देवेंद्र फडणवीस यांची सहज भेट झाल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे.

Baban Shinde, Rajan Patil Meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतल्याने भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. आपल्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो असताना महाराष्ट्र सदनात फडणवीस यांची भेट झाली, यात पक्ष प्रवेशाचा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण आमदार बबन शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिलं. दोन्ही नेत्यांनी आपण भाजप प्रवेशासाठी भेटलो नसल्याचे सांगितले असले तरी राष्ट्रवादीमध्ये होत असलेली मुस्कटदाबी आणि अस्वस्थता हेच भेटीमागचे खरे कारण असल्याचे म्हटले जात आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच बबन शिंदे यांनी भाजप-शिवसेना युतीकडे माढा आणि करमाळा या दोन मतदारसंघात तिकीट मागितले होते. मात्र या दोन्ही जागा शिवसेनेकडे असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे ही दोन्ही तिकिटे देण्याची मागणी करावी, अशी विनंती फडणवीस यांना केली होती. मात्र तत्कालीन शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी माढा या एकाच मतदारसंघात तिकीट देण्याची तयारी दर्शवली. शिंदे यांना त्यांचे बंधू संजयामामा शिंदे यांच्यासाठी करमाळा येथेही तिकीट हवे होते. यावेळी दोन तिकीट न मिळाल्याने बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीमधून तर त्यांचे बंधू संजयामामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवत दोन्ही मतदारसंघातून विजय मिळविला आणि शिवसेनेचे दोन आमदार कमी झाले होते. 

वास्तविक सोलापूर जिल्ह्यात राहिलेली राष्ट्रवादी ही केवळ शिंदे बंधू आणि राजन पाटील यांच्यामुळे उरली हे वास्तव आहे. मात्र कायम शरद पवार आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहून आणि तब्बल सहा वेळा आमदार म्हणून विजयी झालेल्या बबन शिंदे यांना कधीही मंत्रिपद दिले नाही. बबन शिंदे यांच्यावर सातत्याने राष्ट्रवादीत अन्याय होत असल्याची भावना शिंदे यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. बबन शिंदे यांची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद आहे आणि याच ताकदीवर माढा, करमाळा आणि मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. आता पुन्हा राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे अपेक्षितच होते.

ईडी चौकशी आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे बबन शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेतली?
तसे पहिले तर शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्यावेळी भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले आपले बंधू संजयामामा शिंदे यांना उघड मदत करत फडणवीस यांना मदत केली होती. यातच सध्या आमदार बबन शिंदे यांना काही तक्रारींमुळे ईडीच्या चौकशीला देखील सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील मोजके मोठे साखर सम्राट म्हणून शिंदे यांच्याकडे पहिले जाते. सध्या शिंदे यांचे सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याची साखळी तयार असून शेतकऱ्यांशी थेट संपर्क असणारा मास लीडर म्हणून त्यांची ओळख आहे. बबनदादा शिंदे यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदे यांनी गेल्यावेळी माढा लोकसभा निवडणूक वाढवल्याने शिंदे आणि भाजप यात कटुता आली होती. यातच ईडी चौकशी आणि कार्यकर्त्यांचा रेटा यामुळे शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेण्यात आश्चर्य काहीच नाही.

यावेळी शिंदे यांना त्यांचे पुत्र रणजितभय्या शिंदे याना विधानसभेला उमेदवारी द्यायची असून भाजपमध्ये आपल्या मुलाची राजकीय कारकीर्द चांगली होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्या माढाचे भाजप खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांना निवडून आणल्यात सिंहाचा वाट उचलणारे भाजपचे मोहिते पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या खासदार रणजित निंबाळकर यांनी शिंदे-फडणवीस भेटीसाठी विशेष प्रयत्न करत आजची भेट घडवून आणल्याने भाजपाची माढा लोकसभा मतदारसंघात देखील ताकद दुपटीने वाढणार आहे. फडणवीस हे नेहमीच बेरजेचे गणिते करत असल्याने परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यासाठी पर्याय म्हणून शिंदे गटाला जवळ केल्याची शक्यता जास्त आहे.

पक्षाकडून साथ मिळत नसल्याचं राजन पाटील यांना दु:ख
राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मोहोळ मतदारसंघाचे किंग मेकर राजन पाटील यांनीही शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निष्ठावान म्हणून ओळख असणाऱ्या अनगरकर पाटील यांना सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद आरोपांना सामोरे जावे लागत होते. सातत्याने तक्रारी करुनही राजन पाटील यांना पक्षाकडून साथ मिळत नसल्याचे दुःख आहे. मतदारसंघात कोणतीही ताकद नसताना आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या पक्षाच्या दुय्यम नेत्याला पक्षाकडून ताकद मिळत असल्याची भावना सध्या राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यात वाढू लागली आहे. त्यामुळे आता राजन पाटील यांनीही आर या पार भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यातूनच फडणवीस यांची भेट घेतली असली तरी यामागे आपल्याला त्रास देणाऱ्या नेत्याच्या फायली पुन्हा चौकशीसाठी बाहेर काढण्याचा कानमंत्र दिला नसेल तर नवल.

...तर भाजपसाठी बंपर लॉटरी
राजन पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशामुळे मोहोळ विधानसभा आयतीच भाजपाला मिळणार असून सोलापूर लोकसभेतील ताकद देखील वाढणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना हे दोन्ही नेते लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीसाठी बंपर लॉटरी ठरणार आहेत. बबन शिंदे यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू आमदार संजयामामा शिंदे हे देखील भाजपमध्ये आल्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे  बबनदादा शिंदे हे अजून अडीच वर्षात भाजपमध्ये प्रवेश करु शकणार नसले तरी या काळात माढा, करमाळा आणि मोहोळ मतदारसंघातील सर्व कामे फडणवीस यांच्या मार्फत मार्गाला लावून घेतील हे मात्र नक्की 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget