एक्स्प्लोर

शंभर कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता, 43 कोटी रुपये जप्त; सोलापूरमध्ये टाकलेल्या छाप्यात आयकर विभागाला काय सापडलं?

प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली.

  पंढरपूर : दोन आठवड्यापूर्वी पंढरपूरचे साखर कारखानदार (Pandharpur News) अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आणि सोलापूरच्या अश्विनी हॅस्पीटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्या छाप्यात 100 कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. 43 कोटी जप्त करण्यात आले आहेत. 

प्राप्तिकर विभागाने 25  ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली. या शोध मोहिमेत 20 हून अधिक ठिकाणी हे छापे पडले.  महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही कारवाई झाली.

काय नेमके सापडले?

या शोध मोहिमेदरम्यान, हार्ड कॉपी दस्तऐवज आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले आहेत. हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.  या पुराव्यांवरून या व्यावसायीकांनी अवलंबलेल्या करचुकवेगिरीच्या विविध पद्धती उघड झाल्यात. ज्यात बोगस खर्चाचे बुकिंग, अघोषित रोख विक्री, अस्पष्ट कर्ज, क्रेडिट नोंदी आहेत. 

साखर कारखान्यावरच्या कारवाईत काय सापडले?

 वाळू उत्खनन आणि साखर उत्पादनात गुंतलेल्या गटाच्या बाबतीत  15 कोटीपेक्षा जास्त साखरेच्या बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत.  15 कोटी जप्त करण्यात आलेत. या  शोध कारवाईतून असे समोर आले आहे की, या गटाने आपल्या खात्यांच्या वहीत बोगस असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात आपले बेहिशेबी उत्पन्न सादर केले आहे.  समूहाच्या अनेक कर्जदारांनी, तसेच समूहाच्या प्रवर्तकांनी हे मान्य केले आहे की समूहाने 10 कोटी पेक्षा जास्त बेहिशेबी रोकड निर्माण केली आहे.  अशाप्रकारे 10 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. या शिवाय  सुमारे 43 कोटीच्या भांडवली नफ्याचे पुरावे, नॉन-फाइलर कॉर्पोरेट संस्थेच्या मालमत्तेच्या विक्रीवर 43 कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत.

वैद्यकीय व्यावसायीकांकडे काय सापडले?

आरोग्य सेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या दुसऱ्या  गटाकडे काही बाबी आढळून आल्यात. रस्ते बांधकाम, कॅपिटेशन फी आणि डॉक्टर, पीजी विद्यार्थ्यांना दिलेला पगार आणि स्टायपेंड यांचा परतावा दर्शविणाऱ्या बोगस रोख पावत्यांचे पुरावे आढळले आहेत. या शिवाय बोगस खर्चाचे बुकिंग आणि कंत्राटी पद्धतीने 35  कोटींची देयके पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत. या गटाचे अघोषित 35 कोटी जप्त करण्यात आले आहेत. 

आत्तापर्यंत किती संपत्ती आढळली?

 आतापर्यंत या शोध मोहिमेत 50 कोटींहून अधिकचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. 100 कोटी पुढे अघोषित मालमत्ता सापडली आहे. 5 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मास विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी
वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मास विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी
विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
ATS Action In Pune And Solapur: पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाचवेळी छापे; महाराष्ट्र एटीएसची सगळ्यात मोठी कारवाई, सोलापुरमधून एकाला अटक
पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाचवेळी छापे; महाराष्ट्र एटीएसची सगळ्यात मोठी कारवाई, सोलापुरमधून एकाला अटक

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget