Sambhajiraje : संभाजीराजे यांनी रणशिंग फुंकले, तुळजापुरात 'स्वराज्य' संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण
संभाजीराजेनी स्वराज्य संघटनेची सुरुवात करताना सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा पाया रचला आहे. स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही, मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Sambhajiraje : Sambhajiraje : राज्यसभेचे माजी खासदार, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य संघटनेच्या लोगोचे अनावरण केले. तुळजापुरात आयोजित सभेत संभाजीराजेनी स्वराज्य संघटनेची अधिकृत सुरुवात करताना सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा पाया रचला आहे. यावेळी त्यांनी बोलताना स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही, मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा असल्याचे सांगत स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांनी या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गुम भागात जाणार असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्य लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज तुळजापूरात आई भवानीच्या मंदिरासमोरून स्वराज्य संघटनेची सुरुवात होत आहे. आमच्याकडे लोकांसारखा पैसा नाही. काही जण म्हणतील की हे मधूनच कुठून आले? केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वंशज आहे म्हणून हे करत आहेत. मात्र, मी माझा राजवाडा 20 वर्षांपासून सोडून दिला आहे. माझं वैभव सोडून दिलं आहे. महिन्यात पाच दिवसांपेक्षा जास्त मी तिथे राहत नाही.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी लोकांना समजवण्याचे काम केलं
संभाजीराजे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी लोकांना समजावले होते. त्यानंतर शासनाला पर्याय सुचवले होते. देवेंद्र फडणवीस यांनाही टिकणारे आरक्षण द्या म्हणून सांगितले होते. आताचे मुख्यमंत्री पॉसिटिव्ह आहेत, त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अबू आझमींना फटकारले
औरंगजेबबद्दल तो आमदार म्हणतो चुकीची मांडणी झाली. अशांना देशातून बाहेर फेकलं पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये करणारी लोक बेशरम असल्याची हल्लाबोल त्यांनी केला. मात्र, यापुढे असं चालणार नसणार नसल्याचे ते म्हणाले. स्वराज्य संघटनेत कडक वागणार असल्याचे सांगत आम्हाला डिवचल्यास आम्ही अंगावर येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार
दरम्यान, संभाजीराजे यांनी या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गुम भागात जाणार असल्याचे ते म्हणाले. माझं स्वप्न आहे राज्यातील 50 किल्ले पूर्वीच्या रूपात आले पाहिजेत.किल्ल्याचे संवर्धन करणे हे देखील आमच्या संघटनेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.