(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर कल्याणराव काळेंची सत्ता, पराभूत अभिजित पाटलांची गाडी फोडल्यानं गालबोट
Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election : अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने आले होते.
Sahakar Shiromani Sakhar Karkhana : पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर कल्याणराव काळे यांनी विजय मिळवला आहे. आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या पॅनलने जवळपास 1850 मताच्या आघाडीने बाजी मारत आपली ताकद दाखऊन दिली . मात्र विजयी जल्लोषात पराभूत अभिजित पाटील यांच्या गाडीची काच फोडली, यामुळे गालबोट लागले असून यात पाटील गटाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. (Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दोन लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघातील 105 गावात कार्यक्षेत्र आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासह पंढरपूर मंगळवेढा , सांगोला , मोहोळ आणि माढा या विधानसभा मतदारसंघात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत (Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election) राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने आले होते. शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीत घेतल्याने जुने राष्ट्रवादीचे कल्याण काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील आणि गणेश पाटील ही टीम नाराज होती. यातच अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणी पॅनल उभे केल्याने राष्ट्रवादीत फूट उघड झाली होती. आज मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून कल्याण काळे यांच्या पॅनलने आघाडी घेतल्याने बाहेर जल्लोष सुरू झाला आणि यातच काही अज्ञात कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या गाडीची काच फोडली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. यामुळे संतप्त झालेले पाटील यांचे कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात जाऊन घोषणाबाजी करत आंदोलन केले. तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीपूर्वीच मतपत्रिकेची क्लिप व्हायरल
पंढरपुरातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीपूर्वीच मतपत्रिकेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. शुक्रवारी या कारखान्यासाठी मतदान झालं होतं, रविवारी त्याची मतमोजणी होती. पण त्यापूर्वीच शनिवारी मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलंय. अभिजित पाटील पॅनेलचे चिन्ह असणाऱ्या घड्याळावर शिक्के मारलेली एक मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही मतपत्रिका एखाद्या मतदाराने खोडसाळपणे मतदान केंद्रात शूट करून व्हायरल केल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: