एक्स्प्लोर

मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला, तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, नेमकं काय दिलं आश्वासन?

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी  आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. आज अखेर त्यांनी तीन दिवसानंतर आंदोलन मागे घेतले आहे.

Rohit Pawar : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. आज अखेर त्यांनी तीन दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले. 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितले. आपल्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. या अटीसंदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावे लागेल असे महाजन यांन सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. 

 रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे 

शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभझाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?

कर्जमाफी झाल्यावर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यासंदर्भात पत्र देणं गरजेचं होते. असे केले असते तर उपोषणाची वेळ आली नसती. काहीतरी मार्ग निघाला असता असे महाजन म्हणाले. जवळपास 37 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. चर्चा कल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. यासाठी चर्चा करावी लागेल असे महाजन म्हणाले. सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. शेतकऱ्यांचे ज्यावेळी नुकसान झाले त्यावेळी सरकारनं चांगली मदत केली असल्याचे महाजन म्हणाले. कर्जमाफीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे वाटत असेल तर आपण चर्चा करु. 22 तारखेच्या आत यामध्ये बैठक घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे महाजन म्हणाले. 

महात्मा फुले यांच्या नावाने 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली, त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घेतला, त्या शेतकऱ्यांना आताच्या या योजेनेमध्ये लाभ मिळू शकतो. या सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे. रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे, पण यामध्ये वाढ करावी असी मागणी रोहित पवारांनी केली. या योजनेतील अटीमुळं अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, त्यामुळं या योजनेतील अटी काढाव्यात असे रोहित पवार म्हणाले. सरकारकडे चर्चेसाठी जाताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रविकांत तुपकर, किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेकापचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ हे सर्वजण येतील असे रोहित पवार म्हणाले. 

1 रुपयामध्ये जी पिक विमा योजना होती ती पुन्हा सुरु करावी

सरकारला विनंती आहे की, येणारं वर्ष कठीण आहे यंदा पाऊस कमी पडणार आहे. शेतात काही पिकणार नाही. पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करणं गरजेचं आहे असे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जी पिक विमा योजना होती. ती पिक विमा योजना परत सुरु करावी अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे. 

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget