एक्स्प्लोर

मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं

साधारण 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिखर समितीने मंजुरी दिली.

सोलापूर: पंढरपूर (Pandhapur) कॉरिडॉर आणि विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या मुंबईत मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह महसूल आणि जलसंपदा विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि बाकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यातच पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर, आता मंजुरी देण्यात आली आहे. 

पंढरपूर देवस्थान विकास आराखडा आणि कॉरिडॉरसाठी साधारण 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिखर समितीने मंजुरी दिली. पंढरपूरला पुढील 50 वर्षात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पंढरपूरसाठी मंदिर परिसरात कॉरिडॉर आणि शहरात विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. जवळपास 4000 कोटींचा हा आराखडा असून याला आता मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने मंजुरी दिल्याने पंढरपुरात लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

अवघा विश्वाचा देव असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण मोठ्या संख्येने आषाढी, कार्तिकीसह पंधरवाडी एकादशीला देखील भेट देतात. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस कित्येक पटीने वाढत चाललेली आहे, गेल्या आषाढी एकादशीला तब्बल 28 लाख भाविक पंढरीत आल्याची नोंदणी एआय तंत्रज्ञानाने केल्याचं समोर आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर परिसराचा विस्तार आणि विकासाच्या दृष्टीने नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरात दुर्घटना घडू नये, येणाऱ्या भाविकांना विठ्ठलाचे सुलभ, सहज दर्शन व्हावे यासाठी हा आराखडा राबवला असून मुख्यमंत्र्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना केलं आश्वासित

पंढरपूर कॉरिडॉरला काही स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला होता, वर्षानुवर्षे येथील परिसरात असलेल्या आपल्या दुकानाचे स्थलांतर होणार असल्याने व्यापाऱ्यांनी विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर येथील सभेतही, व्यापाऱ्यांना उद्देशून कॉरिडॉरमुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट अधिक होईल, असे सांगत लवकरच विकास आराखडा मंजूर होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, आता शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 

हेही वाचा

महाराष्ट्र दिननिमित्त विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडीत दागिन्यांचा साज, भाविकांची मोठी गर्दी

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Embed widget