एक्स्प्लोर

Prakash Mahajan : महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या 'रुपात' अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल

Prakash Mahajan On Satara Doctor Suicide : जयकुमार गोरेंसारखे लोक हे मूळचे भाजपचे नाहीत, ते बाहेरून येताना सोबत रोग घेऊन आले आणि त्यामुळे पक्ष बदनाम होत आहे असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

सोलापूर: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून (Phaltan Doctor Suicide) मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांची रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर जोरदार टीका केली. मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून ही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. जयकुमार गोरे सारखे लोक हे मूळचे बाहेरचे आहेत, बाहेरून येताना त्यांनी सोबत रोग आणल्याची टीकाही महाजन यांनी केली.

फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरुन प्रकाश महाजन यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या वारस कोण यावर बोलणाऱ्या पाशा पटेल यांच्यावरही त्यांनी उपटसुंभ म्हणत टीका केली.

Prakash Mahajan On Rupali Chakankar : अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत?

फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन मृत महिलेचे चॅट समोर आणले. त्यावरून प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली. रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मुख्यमंत्री फडणवीस हे रणजीतसिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात? चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही. अशा प्रकारची माणसं तुमच्या भोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच.

Prakash Mahajan On jaykumar Gore : जयकुमार गोरेंसारख्या लोकांनी बाहेरुन रोग आणला

जयकुमार गोरे यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली. ते म्हणाले की, "जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचं लोकांनी काय काय दाखवलं नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आलं ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारलं. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मूळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला."

राज्याचा एक मंत्री असं कसं काय बोलू शकतो? समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला.

Prakash Mahajan On Pasha Patel : पाशा पटेल उपटसुंभ

गोपीनाथ मुंडे यांच्या वारस कोण यावर बोलणाऱ्या पाशा पटेल याना देखील महाजनानी सुनावलं. कोण पाशा पटेल? तो उपटसुंभ अशी टीका महाजन यांनी केली. ते म्हणाले की, "पाशा पटेल इतका मतलबी आणि संधीसाधू माणूस सापडणार नाही. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं आणि त्यांचं पार्थिव परळीत आलं, तेव्हा धनंजय मुंडेनी अंत्यसंस्कार करावे असं म्हणणारा पाशा पटेल होता. त्यानां माहिती नाही का गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी काय उद्गार काढले होते. त्यामुळे तो कसं काय वारस होऊ शकतो?

पाशा पटेल यांना त्यांची मुलं वारस ठरवतील का हे बघावं. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि ओबीसी वर्गाला आहे.. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा फक्त पंकजा मुंडेच आहेत, दुसरं कोणी नाही असं प्रकाश महाजन म्हणाले.

ही बातमी वाचा:

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Embed widget