एक्स्प्लोर

Pandharpur News : विठुरायाच्या पगारी सेवेसाठी अखेर मिळाला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी, तब्बल वीस महिन्यानंतर शोध पूर्ण

तब्बल वीस महिन्यानंतर विठुरायाच्या पगारी सेवेसाठी अखेर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाला आहे. नांदेडमधील धर्माबाद इथे कार्यरत असणाऱ्या राजेंद्र शेळके यांची विठ्ठल मंदिरात पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी म्हणूने नेमणूक करण्यात आली आहे.

Pandharpur News : अखेर विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Temple) कार्यकारी अधिकारी पदाचा शोध संपला असून राजेंद्र शेळके या उपजिल्हाधिकाऱ्याने देवाची सेवा करण्यास संमती दाखवल्यावर शासनाने शेळके यांची विठ्ठल मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नांदेड येथील धर्माबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या शेळके यांनी विठ्ठल मंदिरात पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास संमती दाखवल्याने शासनाने त्यांची मंदिर समितीवर कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

राजेंद्र शेळके लवकरच रुजू होणार

विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षभरातील देशभरातून लाखो भाविक येथे येत असतात. दुर्दैवाने मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी मात्र गेल्या अनेक महिन्यापासून एकही अधिकारी पुढे यायला तयार नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते.  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही विधी व न्याय विभागाकडे असून यासाठी प्रत्येक वेळी महसूल विभागाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्याकडे याचा पदभार दिला जात होता. यापूर्वी 9 सप्टेंबर 2021 रोजी तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्या प्रतिनियुक्तीचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मंदिर समितीला नियमित कार्यकारी अधिकारी मिळालेलाच नव्हता. आता तब्बल 20 महिन्यानंतर विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके लवकरच रुजू होणार असून येत्या आषाढी यात्रेत त्यांना खूप काही शिकायला मिळेल.

20 महिन्यांनंतर शोध पूर्ण

उपजिल्हाधिकाऱ्यांना फील्डवर अथवा मोक्याच्या जागांवर काम करण्यात जेवढे स्वारस्य असते तेवढे विठ्ठल मंदिरात येऊन पूर्णवेळ काम करायला नसते. यातच शासनाच्या नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवायचे असेल तर त्यासाठी या अधिकाऱ्याची विनंती अथवा संमती आवश्यक असते. त्यामुळेच सामान्य प्रशासन विभागाला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर कार्यकारी नियुक्तीसाठी वारंवार विनंती पत्रे काढली होती. आता 20 महिन्यांनंतर हा शोध पूर्ण झाला आहे.

सध्या राज्यातील शिंदे सरकारने विठ्ठल मंदिर विकास प्रकल्प या 73 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा महत्त्वाकांक्षी आराखडा व्यवस्थित राबवण्यासाठी शासनाला याठिकाणी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून पाहिजे होता. यातच विठ्ठल मंदिरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नेमलेली शिवसेना भाजपच्या समितीची मुदत संपून 2 वर्षे झाली तरी अजून नवीन समिती अस्तित्वात आली नव्हती. मंदिरातील प्रशासन संपूर्णपणे कोलमडून गेल्याने पूर्णवेळ कार्यकारी अधिकाऱ्याची गरज होती. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांची मग्रुरीचे अनेक प्रसंग वारंवार येत असून गैरप्रकाराचे देखील अनेक आरोप होत असतात. यात सध्या पदभार असणाऱ्या तुषार ठोंबरे या अधिकाऱ्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करुन कर्मचाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. मंदिराला शिस्त लावून भाविकांच्या गैरसोयी दूर करणे, भाविकांच्या विकासाच्या योजनांना गती देणे आणि 73 कोटीच्या मंदिर विकास आराखड्याची सुरुवात करणे ही प्रमुख आव्हाने नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या समोर असणार आहेत. येत्या चार दिवसात शेळके हे आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळत आहे. 


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget