एक्स्प्लोर

शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या वडीलांचं निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुखयांचे अल्पशा आजाराने आज निधन झालं.

Popat Deshmukh Passes Away :  सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुखयांचे अल्पशा आजाराने आज निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता

पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्वर्गीय गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहून विक्रमी 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, इतक्या मोठ्या राजकीय वारशाची पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात व त्यांना आमदार बनविण्यामागे पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या मंगळवारी (ता. 12) सकाळी 9 वाजता पेनूर (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सांगोला मतदारसंघात शेकाप आणि गणपतराव देशमुखांचं वर्चस्व राहिलंय. एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षातून गणपतराव देशमुख विक्रमी 11 वेळा आमदार झाले 2014 साली 87 वर्षांचे गणपतराव सांगोल्यातून शेवटची निवडणूक लढले आणि जिंकलेही. पण 2019 मध्ये गणपतरावांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख काही मतांच्या फरकानं पराभूत झाले. अनिकेत देशमुखांच्या पराभवाचं हे शल्य शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं. यंदा डॉ. बाबासाहेब देशमुख जिंकले आणि पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात आमदारकी आली. दरम्यान, बाबासाहेब देशमुख यांच्या विधानसभेच्या विजयात त्यांचे वडील पोपट देशमुख यांचा मोलाचा वाटा होता पोपट देशमुख हे स्वभावाने शांत आणि संजयमी होते. त्यांच्या स्वभावामुळं सर्वत्र त्यांचा वावर होता. पोपट देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shahajibapu Patil vs Babasaheb Deshmukh : शहाजीबापू झाडी डोंगरच्या डायलॉगमुळे फेमस झाले, आता बाबासाहेब देशमुख 25 हजार झाडं लावून सांगोला हिरवंगार करणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget