मारकडवाडीच्या ग्रामस्थांविरोधात अखेर गुन्हा दाखल, प्रशासनाचे आदेश डावलूण समाजात द्वेष भावना निर्माण केल्याचा आरोप
Solapur Markadwadi News : बॅलेट पेपरवरील (ballot paper) मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील (Markadwadi ) 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur Markadwadi News : बॅलेट पेपरवरील (ballot paper) मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील (Markadwadi ) 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
गुन्हा झालेल्या आरोपींची नावे :
मारकडवाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ 1) संजय हरिभाऊ वाघमोडे 2) राजेद्र अंकुश मारकड 3) वैभव वाघमोडे 4) विजय वाघमोडे 5) विलास आद्रट 6) रणजित जिजाबा मारकड 7) लक्ष्मण सिताराम मारकड (8) सर्जेराव बाबुराव लोखंडे (9) संदिपान आण्णा मारकड 10) अमित वाघमोडे 11) दत्तु राघु दडस 12) आबा नाना मारकड 13) बबन दादा वाघमोडे 14) मारुती शंकर रणदिवे. 15) नानासाहेब मारकड. 16) संजय नरळे. 17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी. व इतर 100 ते 200 लोक. हा गुन्हा काल दाखल झालेला आहे. ज्याची माहिती आज समोर आली आहे. आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोड्या वेळात तो गुन्हा देखील दाखल होईल.
नेमकं प्रकरण काय?
विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं होतं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले होते. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला होता. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना या आधी देण्यात आले होते. पण प्रशासनाने त्याला नकार दिला होता. तरीदेखील गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी मारकडवाडीत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळं मारकडवाडीत आज होणारी मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द