एक्स्प्लोर

राज्यातील राजकारणात अजून एका पुतण्याने थोपटले काका विरुद्ध दंड, शिंदे घराण्यात राजकीय संघर्ष

आज माढा तालुक्यातील मानेगाव येथील सभेत धनराज शिंदे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करताना शरद पवार यांनी आपणास उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

सोलापूर :  राज्यातील राजकारणात काका आणि पुतण्या या नात्यातील प्रेम नेहमीच समोर येत आले आहे . मग ठाकरे किंवा पवार यांच्यासारखी मोठी कुटुंब असोत किंवा आमदार खासदाराचे कुटुंब असो , कायम पुतण्या हा काकाच्या विरोधात जातानाची अनेक उदाहरणे दिसत असतात . तसेच एक उदाहरण आता समोर आले असून माढा तालुक्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांच्याविरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी दंड थोपटले आहे.  मी बंड उशिरा केले पण मतदारांनी लोकसभेलाच केल्याचा टोलाही त्याने लगावला आहे. 

माढ्याचे सलग सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनदादा शिंदे यांना जिल्ह्यात कायम पर्मनंट आमदार या नावाने ओळखले जाते.प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत जाते असा अनुभव असणाऱ्या आमदार शिंदे याना त्यांच्या लहान भावाचा मुलगा धनराज रमेश शिंदे यांनी आता आवाहन देत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आजवर आमदार शिंदे यांची निवडणुकीतील महत्वाची जबाबदारी त्यांचे धाकटे बंधू रमेश मालक शिंदे हे पाहत होते . मात्र गेल्या काही महिन्यापासून शिंदे कुटुंबात वादाचे खटके उडत गेले . त्याला कारणही हाच धनराज होता . गेल्या पंचायत समितीला त्याचे तिकीट कापण्याचा प्रयत्न झाला मात्र तरीही तो उभारून निवडून आला . त्यानंतर सभापती पदाची निवड करतानाही त्याला डावलण्यात आल्याने धनराज व त्याचे कुटुंब नाराज होते. 

शरद पवारांनी उमेदवारी दिल्याचे आश्वासन

आज माढा तालुक्यातील मानेगाव येथील सभेत त्याने आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करताना शरद पवार यांनी आपणास उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगितले. काका बबनदादा हे पुत्र प्रेमामुळे आंधळे झाल्याने त्यांनी राजकीय संन्यास घेऊन मुलाला उमेदवारी दिल्याचा टोला लागवला. आपण रणजित शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र ऐनवेळी काका बबनदादा शिंदे रिंगणात आले तरी पवार साहेबांना एकदा शब्द दिला की उमेदवारी मिळाल्यावर समोर कोण आहे याचा विचार नसल्याचे सांगत थेट आव्हान दिले.

मोकळ्या मनाने निर्णय घेतला : धनराज शिंदे

 मी बंडाला उशीर केला असला तरी तालुक्यातील जनतेने त्यांच्या विरोधात लोकसभा मतदानाच्यावेळीच बंड केल्याचे सांगतात आम्हाला साखर कारखानदार आमदार नको आहे अशी जनतेची भूमिका असल्याचे सांगितले. मी कायम शरद पवार यांच्या सोबत राहिलो असून पंचायत समिती सदस्य देखील त्यांच्याच पक्षातून झालो . नंतर मी कधीही भाजप , शिवसेना किंवा अजितदादा यांच्या स्टेजवर गेलो नाही ना माझे यातील कोणत्या नेत्यांसोबत फोटो आहेत असे धनराज शिंदे यांनी सांगितले. हा निर्णय मोकळ्या मनाने घेतल्यानेच आज मला दडपण जाऊन मोकळे मोकळे वाटत असल्याचा टोला लगावला. 

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut FULL  PC : शिंदेंनी बेळगावात जाऊन कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाहीतBhaskar Jadhav  MVA : पुरेसं संख्याबळ नसलेल्या विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार?CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
Embed widget