Madha Lok Sabha Constituency : माढ्यात शरद पवारांची नवी खेळी? प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट, उमेदवारी देणार का?
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.
माढा, सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत (Madha Lok Sabha Election) पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मोहिते पाटीलांची भूमिका स्पष्ट नसतानाच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं दिसत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत माढ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
मोहिते पाटील जर माढा लढणार नसतील तर मी निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. माढा लोकसभा संदर्भात शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन शरद पवार नवी खेळी खेळणार का?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
प्रवीण गायकवाड काय म्हणाले?
प्रवीण गायकवाड म्हणाले की, मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत. त्यांनी जर तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर ते निवडून येतील. मात्र त्यांनी जर तुतारी हाती घेतली नाही तर मी स्वतः माढ्यातून लढण्यास तयार असल्याचं शरद पवारांना सांगितलं आहे. त्यांनी जर लवकर निर्णय घेतला नाही तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीसाठी मी सज्ज असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे आता माढ्यात कोणाला उमेदवारी मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उमेदवारी कोणाला देणार?
मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. मोहिते पाटलांनी आमचं ठरलंय असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने थेट सध्याचे खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच तिकीट दिले. त्यानंतर मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे ते कधीही शरद पवार गटात जाऊन तुतारी हाती घेतली असं अनेकांना वाटलं मात्र त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यातच आता प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मोहिते पाटील जर माढा लढणार नसतील तर मी निवडणुकीसाठी तयार असल्याचं, प्रवीण गायकवाडांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी-