एक्स्प्लोर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंच्या घरी चूल बंद, लेकरू उपाशी असताना आम्हाला घास कसा गोड लागेल?; आईचे डोळे पाणावले

सरकार का दखल घेत नाही, हेच आम्हाला कळत नाही. अठरापगड जातीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या तब्येतीसाठी आमचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा, अशी मागणी हाकेंच्या आई वडिलांनी केली आहे.

सोलापूर : ओबीसींच्या (OBC Reservation)  लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांचे उपोषण सुरू असताना. दुसरीकडे सांगोला तालुक्यात (Sangola)  हाके यांच्या जुजारपुर येथील घरी चार दिवसापासून चूल पेटली नाही. लक्ष्मण हाके यांच्या वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हाके यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने आईला येऊ नकोस असा निरोप मुलगा लक्ष्मण हाके यांनी दिल्याचे सांगताना तिला अश्रू अनावर होत आहेत . तो अस्वस्थ असून त्याच्या पोटात अन्नाचा कण नसताना आम्हाला कसे अन्न गोड लागेल असा सवाल या वृद्ध माऊलीने केला .

सरकारने दखल घेऊन त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी ही आमची मागणी आहे. माझ्या लेकाची अवस्था बघून मला थंडी- ताप भरला आहे. सरकार का दखल घेत नाही, हेच आम्हाला कळत नाही. अठरापगड जातीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या तब्येतीसाठी आमचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा, अशी मागणी हाकेंच्या आई वडिलांनी केली आहे.

पोटच्या गोळ्याची अवस्था पाहून आईचा जीव तुटतोय 

एक एकराच्या तुकड्यावर आपली उपजीविका करणाऱ्या हाके यांचे वडील शेळ्या मेंढ्या राखायचे काम करतात. त्यांनाही मुलाची अवस्था पाहून चिंता वाटत असून तो समाजासाठी लढत असताना सरकार का लक्ष देत नाही असा सवाल त्यांनी केला.  आपल्या मुलांच्या चिंतेत हाके कुटुंबीय असून त्यांच्या पाठीशी आता राज्यभरातील ओबीसी समाज उभा राहत असल्याचे दिसत आहे . आज जुजारपुर गाव कडकडीत बंद करून गावात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे.  मराठा समाजाप्रमाणे सरकारने आपल्या मुलाच्या उपोषणाची दखल घ्यावी, अशी आर्त हाक लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांची आहे. 

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस

ओबीसी नेते (OBC Reservation)  लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या आंदोलनाचा आजाचा आठवा दिवस आहे दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीये.  त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.  

Video :

हे ही वाचा :

लक्ष्मण हाकेंच्या उशाला बसून विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget