Ladki Bahin Yojna: मोहोळमधील लाडक्या बहिणी सरकारवर नाराज? कार्यक्रमाला येण्यासाठी पाठवलेल्या बस रिकाम्याच परतल्या, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojna: सोलापुरात होणारा हा कार्यक्रम आधी तीन वेळा रद्द झाला आहे, मात्र आज हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. जिल्हाभरातून या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर: राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojna) कार्यक्रम सरकारकडून घेतले जात आहेत, या योजनेची राज्यभरात माहिती पोहोचवण्यात येत आहे. अशातच आजचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojna) कार्यक्रम सोलापुरात पार पडणार आहे, या कार्यक्रमासाठी गावागावातून महिला येतात, त्यांच्या प्रवासासाठी बसचे नियोजन देखील केले जाते. मात्र, सोलापूरमध्ये महिलांना आणण्यासाठी गावी गेलेल्या बसला रिकामे पाठवल्याचे दिसून आले. मोहोळ तालुक्यातील देगांव येथे मराठा समाज बांधवानी आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाचा निषेध करण्यासाठी बस रिकामी पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojna) कार्यक्रमासाठी महिलांना कार्यक्रमात हजर राहता यावे साठी प्रशासनाने 300 हुन अधिक बसेस जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात पाठवल्या आहेत. याचं पद्धतीने मोहोळ तालुक्यातील देगांव येथे देखील प्रशासनाने महिलासाठी बस पाठवली होती. मात्र, मराठा समजातील कार्यकर्त्यांनी ही बस निषेध नोंदवत परत पाठवली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावातील महिला देखील आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojna) प्रचारासाठी आज तिन्ही नेते सोलापुरात असणार आहेत. दुपारी सोलापुरातल्या होम मैदान येथे कार्यक्रम होणार आहे, प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोटला जाणार आहेत. अक्कलकोट येथे विविध विकास्कामाचे लोकार्पण हे फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.त्यानंतर सोलापूर शहरात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमला उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील कार्यक्रमच्या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द?
मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापूर दौरा आणि राज्यमंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सोलापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत.