एक्स्प्लोर

Jaykumar Gore : साताऱ्यात महायुती म्हणून पुढं जाऊ पण आम्हाला सर्व पर्याय खुले, गरज पडल्यास चमत्कार करु, जयकुमार गोरेंचं सूचक वक्तव्य

Jaykumar Gore : साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ पण तसे न घडल्यास आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. गरज पडल्यास चमत्कार करून दाखवू ,असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं. 

सोलापूर :  सातारा जिल्हा परिषदेमध्ये (Satara ZP) भाजपचे (BJP) सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले आहेत. एक अपक्ष आमच्या सोबत आलेला आहे, असं जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी म्हटलं. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असे उत्तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. 

गरज पडल्यास चमत्कार करणार : जयकुमार गोरे

साताऱ्यात भाजपाला बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत आज जयकुमार गोरे यांनी बोलताना सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा करण्यासाठी आमच्यासमोर देखील सर्व पर्याय खुले आहेत असे सांगितले आहे. महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र असे न घडल्यास चमत्कार करून दाखवू असे थेट संकेत गोरे यांनी दिल्याने आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुती अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण अजून रंगणार आहे. 

शिवसेना राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यास एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल

मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईतील नंदनवन बंगल्यावर दोन दिवसांपूर्वी भेट घेतली असल्याची माहिती आहे. साताऱ्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून मंत्री देसाई आणि मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भात भेट घेतली असल्याची माहिती आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या दाराआडच्या बैठका आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षाने राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधलं आहे. 

दरम्यान, भाजपनं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. भाजपचे साताऱ्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न होते. मात्र, भाजपला 27 जागांपर्यंत मजल मारता आली. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस :20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget