एक्स्प्लोर

Jayant Patil on Vishalgad : कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल; विशाळगड हिंसाचारावरून जयंत पाटलांची टीका

तेथील लोकांची घरदारं फोडून तिजोरी लुटून त्यातील संपत्ती नेण्यात आली, हे शिवप्रेमीचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठून तरी आलेल्या ठिकाणावरून हे गुंड आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

सोलापूर : विशाळगडच्या पायथ्याला झालेली घटना अतिशय गंभीर असून पायथ्याशी असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने तेथील धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. तेथील लोकांची घरदारं फोडून तिजोरी लुटून त्यातील संपत्ती नेण्यात आली, हे शिवप्रेमीचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठून तरी आलेल्या ठिकाणावरून हे गुंड आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशातील जयंत पाटील यांनी केली. 

खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत

जयंत पाटील विशाळगड हिंसाचारावर संताप व्यक्त करताना म्हणाले की जर अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली, तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचं हे मोठं अपयश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जयंत पाटील यांनी वाघनखांवरूनही सुद्धा महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत. मात्र, लंडनवरून आणलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? अशी विचारणा त्यांनी केली. 

ती वाघनखं मागच्या दारांनी पोहोचली देखील आहेत. मात्र, वास्तविक मुंबईपासून साताऱ्यापर्यंत या वाघनखांचे स्वागत करायला हवे होते. साताऱ्यात ज्या वस्तूसंग्रहालयात उद्धघाटन सरकार करणार आहे त्याला सरकारने तिकीट लावल्याचे पाटील म्हणाले. सरकारने वाघनखं भाड्याने आणली असून ती वाघनखं मिळवलेली नाहीत, ती तात्पुरत्या स्वरूपात आणली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार?

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे जीआरवर बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला, तर उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधून काय आश्वासन दिलं आहे ते माहिती नाही. यावर सरकारने बऱ्याच चर्चा केल्या आहेत. त्यामुळे सरकारने निर्णयापर्यंत यायला हवं. सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांनी विरोधकांना बोलवून काय निर्णय घेतला हे सांगितले पाहिजे. चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार? असे विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina India Asylum : शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
Congress on PM Modi : जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
Congress : राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे नोकरीच्या संधी : 30 August 2024 ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 PM : 30 August 2024 : Maharashtra NewsVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे: राज्यातील राजकारणाच्या बातम्या सुपरफास्ट : 30 August 2024One Nation One Card : मेट्रो, बस, पार्किंग आणि फेरीसाठी एकच कार्ड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina India Asylum : शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
Congress on PM Modi : जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
Congress : राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue: चुकीला माफी नाही, तुमचं प्रायश्चित अटळ! पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला
शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोदींनी माफी मागताच जयंतरावांचं ट्विट, म्हणाले, चुकीला माफी नाही!
Asna Cyclone warning in Gujarat : तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार; पावसाने हाहाकार केलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक 'तांडव' करण्याची चिन्हे
तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार; पावसाने हाहाकार केलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक 'तांडव' करण्याची चिन्हे
Ambadas Danve :  शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असाल तर उत्तरं द्या, अंबादास दानवेंचे राजकोट प्रकरणी एकनाथ शिंदेंना चार प्रश्न
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंना चार प्रश्न, अंबादास दानवे म्हणाले...
मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत : पीएम मोदी
मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत : पीएम मोदी
Embed widget