(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, अक्कलकोट तालुक्यात शेती पिकांना फटका
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस झाला आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील काही गावात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायाला मिळाली.
Solapur Rain : कमी झालेला पावसाचा (Rain) जोर राज्यात पुन्हा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात कालपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे. यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील काही गावात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायाला मिळाली. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळं ऊसाचे उभे पीक आडवे झाले आहे. तर दुसऱ्या पिकांनी देखील या मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
ऊसासह तूर पिकाला फटका
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, सलगर, नावदगी, गौडगाव, खानापूर, म्हैसलगी या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. उभ्या पिकात पाणी साचलं आहे. तर दुसरीकडं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं ऊसाचे पिक आडवे झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच काही ठिकाणी तूर पिकाचे देखील मोठं नुकसान झाले आहे. संपूर्ण तूर पाण्याखाली गेल्याने त्यातून उत्पादन निघम्याची कमी शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातही आज पावसानं हजेरी लावली आहे. तसेतच वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. तसेच नागपुरात अनेक दिवसांच्या खंडानंतर आज पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लातूर शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीच्या नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काल दिवसभर वातावरणात प्रचंड उकडा जाणवत होता. मात्र, मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाने वीस ते पंचवीस दिवसापेक्षा जास्त उघडीप दिली होती. दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: