अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदमांना न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडीची मागणी फेटाळली
Solapur News Update : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम (Ramesh Kadman) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Solapur News Update : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम (Ramesh Kadman) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेतून आजीच्या नावे पदाचा गैरवापर करून कर्ज घेऊन अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सोलापूर सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या अपहाराच्या प्रकरणात पोलिसांनी रमेश कदम यांना अटक केली होती. त्यानंतर सोलापूर कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आज झालेल्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
अपहाराच्या प्रकरणातील आरोपी रमेश कदम यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामुळे पोलिसांनी मागितलेली दोन दिवसांची पोलिस कस्टडी नाकारण्यात आली आहे. रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने आपली आजी बायमा गणपत कदम यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ही शिक्षा भोगत असतनाच त्यांच्यावर आजी बायमा गणपत कदम यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज घेतल्याच्या आरोप करण्यात आला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. परंतु कदम यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी आज पोलिसांनी केली. यावेळी कदम यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, जी रक्कम घेतल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर केला आहे, ती रक्कम बायमा गणपत कमद यांच्या खात्यावरच आहे. त्यामुळे त्यांनी कोणताच गैरप्रकार केला नाही. वकिलांच्या युक्तीवादानंतर पोलिसांची मागणी फेटाळत कदम यांना न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कदम यांची पुन्हा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये क्रेझ
दरम्यान, रमेश कदम यांना आज न्यायालयात आणले त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते न्यायालय परिसरात उपस्थित होते. कदम न्यायालय परिसरात येताच कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. न्यायालय परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कदम यांनी कार्यकर्त्यांना काळजी घ्या असा सल्ला देखील दिला.