"उद्धव ठाकरे ऐकण्याच्या पलीकडे, राजकारणात येऊन राज्याची वाट लावू नका"
नवाब मलिक यांनी दाऊदची संपत्ती सांभाळण्याचे काम केले त्यांना अटकेनंतरही मंत्रिपदावर ठेवणारी राज्यसत्ता आम्हाला नको आहे असा टोला लगावला.
सोलापूर: उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे सल्ले ऐकण्याच्या पलीकडे गेले आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सल्ले देऊ, अस टोमणा हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांनी लगवला आहे. उद्धव ठाकरे यांनी जवळच्या चांडाळ चौकडीचे किती ऐकायचे हे अगोदर ठरवावे. जर त्यांना समजत नसेल तर त्यांनी राजकारणात येऊन राज्याची वाट लावू नये अशा शब्दात धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
पंढरपूर (Pandharpur) येथे हिंदू महासभेच्यावतीने देसाई यांना क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी देसाई बोलत होते. ज्या पद्धतीने राज्यात एकनाथ शिंदे यांनी विकास कामाची वाटचाल सुरु केली ती उद्धव ठाकरे यांच्या काळात दिसली नाही. नवाब मलिक यांनी दाऊदची संपत्ती सांभाळण्याचे काम केले त्यांना अटकेनंतरही मंत्रिपदावर ठेवणारी राज्यसत्ता आम्हाला नको आहे असा टोला देसाई यांनी लगावला.
याकूब मेनन याला फाशी देऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी कोर्टाला जागवले
काँग्रेस नेते असलम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. त्यांनी याकूब मेनन याला फाशी देऊ नये यासाठी राष्ट्रपतींना रात्रभर निवेदने दिली. सुप्रीम कोर्टाला रात्रभर जागवणारा पालकमंत्री देणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे असाही टोला देसाई यांनी या वेळी लगावला . राज्यात एकनाथ शिंदे यांचीच राज्यसत्ता टिकावी आणि ती बलवान व्हावी आणि अशाच विचाराची राज्यसत्ता महाराष्ट्राला गरजेची असल्याचे देसाई म्हणाले.
मोदींवर टीका करणारी लोकं भामटी आहेत
इस्त्रायल आणि पॅलेस्टिन (Israel Hamas War Updates) युद्धात ज्या हमासने महिलांवर क्रूर अत्याचार केले. ज्यांची महिलांची नग्न धिंड काढली त्यांच्या समर्थनार्थ भारतात निदर्शने करणारी काही नीच लोक ही भारताची विटंबना असल्याचा घणाघात त्यांनी केला. मणिपूरचे सत्य जाणून घ्यावे लागेल असे सांगत मणिपूरचे उदाहरण देऊन मोदींवर टीका करणारी लोकं भामटी आहेत, मणिपूरमध्ये ख्रिश्चन धर्मांतरण होऊन भारत विरोधी चळवळी राबविल्या जात आहेत असे देसाई यांनी सांगितले.
हे ही वाचा: