एक्स्प्लोर

Ajay Kumar Mishra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची अवस्था डमरू वाजवणाऱ्या मदारीसारखी, मंत्री अजयकुमार मिश्रा यांची टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) अवस्था डमरू वाजवणाऱ्या मदारीसारखी असल्याची टीका केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली.

Ajay Kumar Mishra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) अवस्था डमरू वाजवणाऱ्या मदारीसारखी असल्याची टीका केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा (Minister Ajay Kumar Mishra) यांनी केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हजारापेक्षा जास्त माणसे कधी पहिली आहेत का?  मदारी जसा डमरू वाजवताच माणसे गोळा होतात तशीच अवस्था सध्या राहुल गांधींची झाल्याचे मिश्रा म्हणाले. ते पंढरपूरमध्ये (Pandharpur)प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली.

भाजपकडून 2024 च्या लोकसभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांकडे काही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजयकुमार मिश्र यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघ या तीन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या या तिनही मतदारसंघाच्या दौऱ्यावर मंत्री अजयकुमार मिश्रा आहेत. काल (5 जानेवारी 2023) ते उस्मानाबादमध्ये होते. त्यानंतर पंढरपूरमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवदा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे , आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींवर टीका करण्याशिवाय राहुल गांधींनी कुठलीही नवीन गोष्ट सांगितली नाही

गल्लीतून मदारी माकडाला घेऊन निघाल्यावरही 200 लोक त्याच्या मागे फिरतात. तशाच प्रकारची गत राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेची झाली असल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले. सध्या कुठेही त्यांना प्रतिसाद मिळत नाही. राहुल गांधी पुढे चालले की त्यांच्यासोबत फिरणारी 100 बसेस मधील  लोक मागून जातात. सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांनी कुठलीही नवीन गोष्ट भारत जोडो यात्रेत सांगितली नसल्याचे अजयकुमार  मिश्रा म्हणाले.

 काश्मीरमधील दहशतवाद अखेरचा श्वास घेतायेत

मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील आतंकी घटनांमध्ये खूप कमी झाली आहे. हताश झालेले अतिरेकी अशा घटना घडवून निरपराधांवर गोळीबार करतात. मात्र सध्या काश्मीरमधील दहशतवाद अखेरचा श्वास घेत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. सध्या देशातील नक्षली घटनांमध्ये मोठी कपात झाली आहे. पूर्वी 100 जिल्ह्यात असणारा नक्षलवाद आता 40 जिल्ह्यातील काही भागापुरता मर्यादित उरला असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई हे देशातील महत्वाचे शहर असून आम्हा सगळ्यांचेच ते आवडते शहर असल्याचे जयकुमार  मिश्रा यांनी सांगितले. सध्या महिलांवर होत असणारे अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. त्यासाठी गृह विभाग अत्यंत कठोर पावले उचलत असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi: माझी बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले, राहुल गांधींचा मोठा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget