एक्स्प्लोर

Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांच्या पूजेनंतर कुणालाही VIP दर्शन नाही, पासवर मर्यादा 

Ashadhi Wari 2023 : दर्शन पासवरही मर्यादा आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

Ashadhi Wari Latest News : आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. आषाढी एकादशीला पहाटे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शन दिले जाणार नाही असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शनाला सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही. 

आषाढीला येणाऱ्या 20 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी

यावर्षी आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणी करून अषधोपचार करण्याची अभिनव योजना राज्यसरकारकडून राबवली जाणार आहे. गेल्यावर्षी आषाढी यात्रेच्या तोंडावर राज्यात शिंदे सरकार आल्याने भाविकांसाठी खास काही करता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी याप्रमाणे जवळपास 20 लाख वारकऱ्यांचे शहरातील तीन ठिकाणी मेगा आरोग्य कॅम्प घेतले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले . राज्यातून येणाऱ्या जवळपास 450 पायी दिंडी सोहळ्यात देखील आरोग्य तपासणी होणार असून पंढरपूर मधील गोपाळपूर , वाखरी आणि सोलापूर रोड  या तीन ठिकाणी हे मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत . 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रियाTirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Torres Scam : विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
Pritish Nandy Death : प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Embed widget