सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल, तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
Solapur News: रेवणसिद्ध सोन्नद याने 10 जुलै 2022 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र 12 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Siddharam Mhetre: माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांचे बंधू आणि काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे (Shankar Mhetre) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणाला दमदाटी करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. रेवणसिद्ध सोन्नद असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहार रक्कम मागणीने सतत शिवीगाळ, दमदाटीला कंटाळून दुधनी (ता. अक्कलकोट) येथे 40 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. या घटनेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रेसह दोघांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 जुलै रोजी सकाळी पावणे सात वाजता घडली असून 2 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
रेवणसिद्ध सोन्नद याने 10 जुलै 2022 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र 12 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत रेवणसिद्ध याच्याकडे वेळोवेळी ऐश्वर्या वॉटर प्लॅन्ट येथे अपहार केलेल्या पैशांची मागणी करून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून रेवणसिद्ध सोमनाथ याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होत. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये (Akkalkot Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मयत रेवणसिद्ध सोन्नद यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला चौकशीमध्ये काही तक्रार नसल्याचे सांगितले होते. नंतरच्या कालावधीत याबाबत फिर्यादीने घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांमध्ये 2 जानेवारी रोजी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश स्वामी हे करत आहेत.
सोलापूरच्या राजकारणात म्हेत्रे कुटुंबाचा दबदबा
शंकर म्हेत्रे यांचे बंधू सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे. सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.
इतर महत्त्वच्या बातम्या :