Ujani Dam : उजनी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ; आषाढी सोहळ्यात संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाची लगबग; सायंकाळनंतर भीमा नदीत पाणी सोडणार?
Ujani Dam : पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनीकडे (Ujani Dam) येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58 हजार 585 क्युसेक झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त विसर्ग होण्याची शक्यता आहे.

Pandharpur Wari 2025: पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनीकडे (Ujani Dam) येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58 हजार 585 क्युसेक झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सध्या झपाट्याने उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असून आज (20 जून) सकाळी 62% इतकी असणारी पातळी सायंकाळपर्यंत 75 टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आषाढी सोहळ्यात संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी आज सायंकाळनंतर उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी गाठल्यास..
जून महिन्यातच एवढा प्रचंड पाणीसाठा जमा होऊ लागल्याने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरण 75 टक्के वर गेल्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असून 75 टक्के एवढी धरणाची पातळी आषाढी यात्रा संपेपर्यंत कायम ठेवण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे आता येईल ते सर्व पाणी पंढरपुरात महापूर येणार नाही याची दक्षता घेत भीमा नदीमध्ये सोडून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आज जर धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी गाठल्यास उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे.
दरम्यान, यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. जवळपास 60 हजार क्युसिक विसर्गने पाणी धरणाकडे येत असल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे.
कौठा- गडगा महामार्गावर धोकादायक पुलावरून वाहतूक
नांदेडमध्ये कंधार- नायगांव तालुक्याला जोडणाऱ्या कौठा गावाजवळचा पुल धोकादायक बनलाय, तब्बल 60 वर्षांहून अधिक जीर्ण असलेल्या या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत. या पुलावरून अनेकदा वाहन खाली पडून अपघात झाले आहेत. दरम्यान, कंधारचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी याच रस्त्यावरून पर्यटक मोठ्या संख्येने येजा करतात. त्यामुळे या ठिकाणच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
हे ही वाचा























