Solapur News : रेल्वे क्रॉसिंग सिग्नल तपासणीसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला केके एक्स्प्रेसची धडक; अपघातात जागीच मृत्यू
Solapur News : करमाळा तालुक्यातील जिंती येथे रेल्वे क्रॉसिंग सिग्नल चेकिंगसाठी जात असताना केके एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या धडकेत रेल्वे पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Solapur News : करमाळा (Karmala) तालुक्यातील जिंती येथे रेल्वे क्रॉसिंग सिग्नल चेकिंगसाठी जात असताना केके एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या धडकेत रेल्वे पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीकांत वाघमारे असे या मृत रेल्वे पोलीस शिपायाचे नाव असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे गाड्यांची क्रॉसिंग होत असताना चेकिंगसाठी गेलेल्या रेल्वे पोलीस शिपाई श्रीकांत वाघमारे (वय ४२) रा. कुर्डुवाडी ता. माढा यांचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास करमाळा तालुक्यातील जिंती येथे घडली आहे. यामध्ये वाघमारे यांचा जागी मृत्यू झाला आहे.
वाघमारे हे रेल्वे क्रॉसिंग असताना सिग्नल चेकिंग साठी आले होते. त्यावेळी सदरचा अपघात झाला. त्यांना वेगवान जात असलेल्या केके एक्सप्रेस या गाडीने जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना जिंती रोड सिग्नलला झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलीस शिपायाचा अपघातात जागीच मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघमारे हे रेल्वे पोलीस म्हणून कार्यरत होते. जीआरपीएफचे कर्मचारी रेल्वे चेकिंगसाठी परिसरात जात असताना पुढे चेकिंग करून येतो म्हणून श्रीकांत वाघमारे हे इतर कर्मचाऱ्यांपासून पुढे गेले होते. त्यावेळी काकीनाडा व केके एक्सप्रेस यांची क्रॉसिंग होत होती. त्यावेळी वेगवान येणाऱ्या केके एक्सप्रेसचा वाघमारे यांना अंदाज आला नसावा आणि त्या गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने श्रीकांत वाघमारे हे जागीच ठार झाले. यावेळी जीआरपीएफ व रेल्वे पोलीस यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली व त्यांना करमाळ्याच्या दिशेने पाठवण्याचे नियोजन केलं होतं. मात्र त्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झालचे पुढे आले आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस हवालदाराचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. संतोष मंथनवार असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. मंथनवार हे आज सकाळी पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर होते. दरम्यान साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी 12 फेब्रुवारीला सुद्धा रोड ओपनिंगसाठी जात असताना विशेष कृती दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
हे ही वाचा























