एक्स्प्लोर

Shivaji maharaj Statue : माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही

Shivaji maharaj Statue : शिवाजी महाराजांचा (Shivaji maharaj) पुतळा कोसळल्यामुळे आमच्या घरातील एक सदस्य कोसळला असं आम्हाला वाटलं, खूप वाईट वाटलं.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट येथील पुतळा कोसळल्याची घटन घडली. या घटनेनंतर राज्यातील शिवप्रेमींनी संताप आणि दु:ख व्यक्त केलं. तर, दुसरीकडे शासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित पुतळा बनवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित घटनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असून पुतळ्याच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 कोटी जनतेची माफी मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मी 100 वेळा माफी मागायला मागेपुढे पाहाणार नाही, असे म्हटलं. मात्र, पुतळा दुर्घनटेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्याचा वेग ताशी 45 किमी असल्याने हा पुतळा कोसळल्याचे सांगितले होते. आता, याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनीही वाऱ्याच्या वेगाबाबत माहिती दिली. तसेच, पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी वापरलेल्या लोखंडी कामावरही त्यांनी भाष्य केलंय. 
 
शिवाजी महाराजांचा (Shivaji maharaj) पुतळा कोसळल्यामुळे आमच्या घरातील एक सदस्य कोसळला असं आम्हाला वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण, शिवाजी महाराजांचा पुतळ बसवल्यामुळे इथं पर्यंटकांची गर्दी वाढली होती, जगभर आमच्य राजकोटचं नाव झालं. इथं खारी हवा असल्यामुळे 2 वर्षे टिकणारं लोखंड इथं मालवणमध्ये (sindhudurg) केवळ 3 महिनेच टिकू शकते. या पुतळ्याला वापरलेलं लोखंड तसंच होतं, ते वेल्डिंग वैगेरे केलेलं होतं, त्यामुळेच हा पुतळा कोसळला. 6 टन पुतळ्याचं वजन सांभाळणारा चबुतरा अतिशय कमकुवत होता, असेही प्रत्यक्षदर्शी मच्छिमारांनी (Fisherman) सांगितलं. तसेच, माझ्या डोळ्यादेखत हा पुतळा खाली कोसळला, अतिशय दु:ख झालं. मी माझ्या 50 हजार रुपयांच्या ताडपत्री नेऊन तो खाली कोसळेला पुतळा झाकला, असेही प्रत्यक्षदर्शी मच्छिमार सुनिल खंदारे यांनी म्हटलं.  

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळताना तेथील स्थानिक मच्छीमारांनी पहिला होता. त्यानंतर, त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांन याबाबत माहिती दिली, तसेच घटनास्थळी दाखल होत छन्नविछीन्न अवस्थेत कोसळलेला महाराजांचा पुतळा पाहून त्यांनी स्वतःच्या मच्छीमारीसाठी आणलेल्या ताडपत्रीने तो खाली कोसळलेला पूर्ण पुतळा झाकून ठेवला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वाऱ्याचा वेग मोठा नव्हता. मात्र, पुतळा बनवताना वापरण्यात आलेले धातू गंजून गेल्यामुळेच ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या पुतळ्याचं 2 महिन्यांनी ऑडिट व्हायल हवं होतं, ते झालं नाही, पुतळ्याच चबुतरा आणि पुतळ्याचं वजन याचीही तपासणी करण्यात आली नाही. मात्र, या मुद्याचं राजकारण न करता त्याठिकाणी दुसरा पुतळा उभारला जावा. त्या ठिकाणी सर्व गोष्टींचा अभ्यास करुन स्मारक उभारण्यात यावं. रोज डोळ्यादेखत दिसणारं महाराजांचं स्मारक आता पाहता येत नसल्याने दु:ख होत असल्याचंही मच्छीमारांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; इंजिनिअरला अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Devendra Fadnavis: एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Eknath Khadse : खडसेंबाबत गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार : फडणवीसPune Dog Attack : चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला , हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमीJoshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 14 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Devendra Fadnavis: एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
Dharashiv: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या  लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
Sunita Williams : घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
Pune Dog Attack: कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
Embed widget