(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News : स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाजी, राज्यात पहिला क्रमांक
Sindhudurg News : स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण 2022 (Swachh Survekshan) मध्ये पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातील 17 हजार 450 गावे आणि 698 जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली आहे. दिल्ली इथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, केंद्रीय सचिव सर्वेक्षण सुरु केलं. यावेळी देशातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळं, बाजाराची ठिकाणं यांची पडताळणी करण्यात आली होती. या सर्वेक्षणात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस, थेट निरीक्षण, तर नागरिकांचा प्रतिसाद यावर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणचे मूल्यांकन करण्यात आलं. त्या मूल्यमापनामध्ये अव्वल राहिल्यानेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळाला.
2021-22 या वर्षात राज्यातील 17 हजार 450 गावे आणि 689 जिल्ह्यांमधून सिंधुदुर्गला केंद्रीय स्तरावरुन क्रमांक मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले होते. यापूर्वी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणत सिंधुदुर्गने स्वच्छतेत बाजी मारली होती. आता पश्चिम भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला हागणदारी मुक्त होण्याचा मान
2016-17 या वर्षात केंद्राने देशात स्वच्छ जिल्हा स्पर्धा राबवली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पठारी भागात देशात पहिला आला होता. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याने केंद्र शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानामध्ये आशिया खंडात सर्वात प्रथम पूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त होण्याचा मान मिळवला आहे. या देशस्तरीय यशात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाल्याने देशस्तरीय यशात आणखी भर पडली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या