चिपी विमानतळावरील नियमित विमानसेवेची घोषणा हवेतच; तीन दिवसात एकही विमान उतरले नाही, आजचीही फेरी रद्द
तीन दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही आणि आजची फेरीही रद्द झाली आहे. त्यामुळे आजपासून दोन विमान कंपन्यांची नियमित सेवा हे कोकणवासीयांसाठी गाजरच ठरले आहे.
Sindhudurg Chipi Airport News : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ 1 सप्टेंबरपासून नियमित सुरू होण्याची घोषणा हवेत विरली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली होती. विशेष म्हणजे तीन दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही आणि आजची फेरीही रद्द झाली आहे. त्यामुळे आजपासून दोन विमान कंपन्यांची नियमित सेवा हे कोकणवासीयांसाठी गाजरच ठरले आहे.
मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ नियमित सुरू होण्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे आजपासून दोन विमान कंपन्यांची नियमित सेवा हे कोकणवासीयांसाठी गाजरच ठरले आहे. नियमित विमानसेवेने सुरू होण्याच्या घोषणेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्यांच्या आशा प्रफुल्लीत झाल्या होत्या. त्यामुळे चिपीऐवजी मोपा विमानतळालाच पसंती राहिल एवढं नक्की आहे.
चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे. कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरून (Sindhudurg Chipi Airport) आता अनियमित विमानसेवा सुरू आहे. विमानसेवा अनियमित असून याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.
पर्यटन व्यवसायाला फटका
पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जात असे. मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची आवश्यकता आहे, असे स्थानिकांनी म्हटले. चिपी विमानतळावरून ब्लु फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे समुद्र किनारा 8 किलोमीटर असून मालवण सिंधुदुर्ग किल्ला 14 किलोमीटर तर वेंगुर्ले समुद्र किनारा 35 किलोमीटर तर राष्ट्रीय महामार्ग कुडाळ 25 किलोमीटर असल्याने चारी बाजूंनी पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणास मदत होणार असल्याचे म्हटले जात होते. आता, चिपी विमानतळावरून विमानसेवा अनियमित होत असल्याने त्याचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :