एक्स्प्लोर

Jaydeep Apte : जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ, चेतन पाटीलला दिलासा, न्यायालयातील सुनावणीत काय घडलं?

Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलं आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता.  या प्रकरणावरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर, चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसंदर्भात सरकारी वकील ॲड. तुषार भणगे यासंदर्भात माहिती दिली आहे. 

जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ॲड. तुषार भणगे म्हणाले की, आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देतोय.त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती,परंतु न्यायालयाने १३ तारखेपर्यंत (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात. जयदीप आपटे याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती मिळवायची आहे. या प्रकरणातील इतर व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळवायची असल्यानं सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या प्रकरणात तपासकाम करणं गरजेचं असल्यानं न्यायालयानं आमचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील याला ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. सिंधुदुर्ग पोलिसांनी चेतन पाटील यांना अटक केली होती. आज पाटील यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 

दोघांचे कुटुंबीय उपस्थित 

जयदीप आपटे आणि चेतन पाटील या आरोपींची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना आज  मालवण दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीला जयदीप आपटे यांची पत्नी आणि आई उपस्थित होती. तर, चेतन पाटील यांचे बंधू ही सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहिले होते.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या पुतळा दुर्घटना प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आशिष शेलार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. राजकोट किल्ल्यावर जो पुतळा उभारण्यात आला होता त्याच्या उभारणीत घाई झाल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

इतर बातम्या :

Jaydeep Apte: पोलिसांनी सासुरवाडीत 'फिल्डिंग' लावली, पण जयदीप आपटे अचानक कल्याणच्या घरी अवतरला, अलगद पोलिसांच्या हाती लागला

अमेरिकेतसुद्धा पुतळा पडला होता, ही नैसर्गिक घटना, मग आपटेंवर गुन्हा कसा? वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget