एक्स्प्लोर

Sindhudurg News : मालवणातील खोटले गावात 35 हून अधिक कातळशिल्पांचा शोध, मात्र प्राचीन वारसा चिरेखाणींच्या विळख्यात

मालवणमधील खोटले गावच्या सड्यावर 35 हून अधिक कातळशिल्प आढळली आहेत. या कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे आणि माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्त्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेली आहेत

सिंधुदुर्ग : कोकणातील सड्यावर अनेक ठिकाणी कातळशिल्पे कोरलेली आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी सड्यावर कातळशिल्प आढळतात. मालवणमधील खोटले गावच्या सड्यावर 35 हून अधिक कातळशिल्प आढळली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर पडली आहे. खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी' सदृश कातळशिल्पआश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे अशी शक्यता आहे. मात्र ही कातळशिल्प धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.

मालवणमधील खोटले धनगरवाडी सड्यावर आढळलेली कातळशिल्प पांडवांची चित्रे आहेत. मात्र ही कातळशिल्प धोक्यात आली आहेत. या परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी पांडवांची चित्रे नष्ट झाली असे स्थानिकांचे मत आहे. याच ठिकाणी असलेल्या सुमारे 20 फूट लांब आणि 20 फूट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे आणि माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्त्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेली आहेत. कातळशिल्पांचे जतन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 
कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती आणि अन्य 12 अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच 20 फूट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. इथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणून ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याच ठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. 

लज्जागौरी सदृश शिल्प आश्चर्यकारक
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे 'लज्जागौरी' किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता असे मानले जाते. शिवाय स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले आहे.

सिंधु संस्कृतीशी संबंधित उत्खननात लज्जागौरीच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. अनेक आदिवासी समुह या देवीची पूजा करतात. भारतात मध्य भारत, दख्खन, कर्नाटक, आंध्र भागात लज्जागौरीच्या मूर्ती, प्रतिमा सापडल्या आहेत. अमरावती येथे सापडलेली लज्जागौरीची संगमरवरी मूर्ती (सद्या चेन्नई वस्तुसंग्रहालयात आहे.) ही सातवाहन काळातील इ.स. 150 ते 300 यादरम्यान कोरली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळातील अशा काही मूर्ती सापडल्या आहेत. लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फूल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते. खोटले येथील हे कातळशिल्प आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Thane : ठाण्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ म्हणून बॅनर्सRamraje Nibalkar Ajit Pawar NCP : रामराजे निंबाळकर अजित पवारांची साथ सोडुन तुतारी हाती घेणार?Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीकाPM Narendra Modi Speech Poharadevi Washim  : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget