एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी मंत्र्यापेक्षाही वरच्या पदावर जाईन : दीपक केसरकर

Deepak Kesarkar : ज्या ज्या लोकांनी रामटेक बंगल्यात वास्तव्य केलं ते नंतरच्या काळात मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग : राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुरुवातीला नाराज नसल्याचं सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला, त्यांची मला कीव वाटते असं दीपक केसरकर म्हणाले. मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

माझं मंत्रिपद देव ठरवतो

दीपक केसरकर म्हणाले की, "अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे."

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले आहेत ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

मला केंद्रातल्या नेत्यांचा पाठिंबा

दीपक केसरकर म्हणाले की, "मला केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काळजी नाही. कुठल्याही मंत्र्याने कामं केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात असताना केली.  मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असो वा शिक्षण विभाग असो, या विभागात मी मोठी कामं केली. मी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका काढणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहिल असंच काम मी या आधी केलंय आणि पुढच्या काळातही करेन."

नाणारवरून मतभिन्नता? 

नाणार रिफायनरीवरून कोकणातील नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शभंर टक्के होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजीमंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांनी ही रिफायनरी 'ग्रीन रिफायनरी' आहे का हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य केलं. त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील असलेली मतभिन्नता समोर आली आहे.

उदय सामंतांना जगभराची माहिती 

रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दिपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
Nilesh Rane and Vaibhav Naik: 'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक
राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक
राज्यातील वातावरणात मोठा बदल! अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यातील वातावरणात मोठा बदल! अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज काय? 

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Embed widget